शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

भारतीयांविरोधात बोलून गमावलं होतं मंत्रीपद! पुन्हा ब्रिटनच्या होम सेक्रेटरी बनल्या सुएला ब्रेव्हरमन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2022 23:29 IST

सुनक यांनी अनेक मंत्र्यांना बाहेरचा रस्ता दाखवला, तर काहींना एंट्रीही दिली आहे. यात लिझ सरकारमध्ये होम सेक्रेटरी असलेल्या सुएला ब्रेव्हरमन यांचाही समावेश आहे. त्यांची पुन्हा एकदा ब्रिटनच्या गृहमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

ब्रिटनच्या पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर ऋषी सुनक यांनी अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. त्यांनी अनेक मंत्र्यांना बाहेरचा रस्ता दाखवला, तर काहींना एंट्रीही दिली आहे. यात लिझ सरकारमध्ये होम सेक्रेटरी असलेल्या सुएला ब्रेव्हरमन यांचाही समावेश आहे. त्यांची पुन्हा एकदा ब्रिटनच्या गृहमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. "भारतासोबत मुक्त व्यापारासंदर्भात करार केल्यास, ब्रिटेनमध्ये प्रवाशांची संख्या वाढेल. एवढेच नाही, तर व्हिसाची काल मर्यादा संपल्यानंतरही ब्रिटनचे प्रवासी परत जाणार नाहीत. भारतीयांसाठी अशा प्रकारे सीमा खुली केली जाऊ नये," असे ब्रेव्हरमन यांनी एका मुलाखतीत म्हटले होते.

ब्रिटनमध्ये अनेक महत्वाच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. डोमिनिक राब यांना सुनक यांचे डेप्युटी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. तसेच जेरेमी हंट हे अर्थमंत्रीपदावर कायम राहतील. तसेच ज्या मंत्र्यांना आपले पद सोडायला सांगण्यात आले आहे, त्यांत भारतीय वंशाच्या आलोक शर्मा यांचाही समावेश आहे. ते ट्रस सरकारमध्ये मंत्री होते. 

याशिवाय बिझनेस सेक्रेटरी जेकब रीस मोग, न्याय मंत्री ब्रँडन लुईस आणि क्लो स्मिथ यांनाही बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. सुनक सरकारमध्ये बेन वॉलेस यांना पुन्हा संरक्षण राज्यमंत्री करण्यात आले आहे. त्याच वेळी, जेम्स क्लेव्हरली पुन्हा परराष्ट्र सचिव असणार आहेत.

...म्हणून सुएला यांना दाखवण्यात आला होता मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता -सुएला ब्रेव्हरमन यांच्यावर एका खासदाराला ईमेलद्वारे सरकारी कागदपत्रे पाठविल्याचा आणि गोपनीयतेचे उल्लंघन केल्याचा आरोप होता. यानंतर ब्रेव्हरमन यांनी याची जबाबदारी स्वीकारत आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. मात्र, ट्रस सरकार यानंतर लवकरच कोसळले. लिझ ट्रस यांनी आपले अपयश स्वीकारत पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला.

टॅग्स :Rishi Sunakऋषी सुनकEnglandइंग्लंडPoliticsराजकारण