शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

प्रेरणादायी! 2013 मध्ये नोकरी गमावली पण 'तिने' हार नाही मानली; आता महिन्याला कमावते 8 लाख

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2022 14:43 IST

जेनिस टोरेस या महिलेने अशीच प्रेरणादायी कामगिरी केली आहे. 2013 मध्ये तिची नोकरी गेली.

प्रत्येकाच्या आयुष्यात चढ-उतार येत असतात. काहींना नोकरी गमवावी लागते. पण यातही काही जण हार मानत नाहीत. परिस्थितीला तोंड देत जिद्दीने लढतात. अशीच एक कौतुकास्पद घटना समोर आली आहे. अमेरिकेतील इंजिनिअर जेनिस टोरेस या महिलेने अशीच प्रेरणादायी कामगिरी केली आहे. 2013 मध्ये तिची नोकरी गेली. या वेळी तिला महिन्याला पगार 5.5 लाख रुपये होता. म्हणजेच, नोकरीतून तिला वर्षाला तब्बल 66 लाख रुपये मिळत होते. त्यामुळेच 2013 मध्ये जेव्हा त्यांची नोकरी गेली, तेव्हा तिला मोठा धक्काच बसला.

नोकरी गेल्यानंतर घर कसं चालवायचं हा प्रश्न उभा राहिला. मात्र, याचवेळी टोरेस यांनी मनाशी पक्का निश्चिय केला की, आता असे काही काम करू जेणेकरुन उत्पन्नाचा स्रोत कायमस्वरुपी सुरू राहील. नोकरी असो वा नसो, पण स्वतःच्या रोजच्या खर्चाचं टेन्शन राहणार नाही. नोकरीच्या काळात तिने ‘डेलिश डी लाइट्स’ नावाने एक फूड ब्लॉग सुरू केला होता. पण तेव्हा हा ब्लॉग कमाईचं साधन नव्हतं तर एक छंद होता. नोकरी गेल्यानंतर टोरेसने या ब्लॉगकडे लक्ष देण्यास सुरुवात केली. 

सीएनबीसीच्या ‘मेक इट हॅपन’ कार्यक्रमात बोलताना टोरेसने 2015 पर्यंत हळूहळू हा फूड ब्लॉग इतका लोकप्रिय झाला की त्याची महिन्याला वाचक संख्या 15,000 पर्यंत पोहोचली असं म्हटलं आहे. त्यानंतर मी यो क्वेरो डिनेरो  हे मनी पॉडकास्ट सुरू केलं. या पॉडकास्टद्वारे, मी माझा अनुभव शेअर करते आणि लोकांना पैसे कसे कमवायचे ते शिकवते असंही सांगितलं. टोरेसने ब्लॉग लिहायला सुरुवात केली, व यासोबतच त्या फ्रीलान्सर म्हणून विविध कामं करत गेली. त्यामुळे तिच्या उत्पन्नात भर पडत गेली. 

टोरेसने माझ्या सर्व कामांतून मिळणारं उत्पन्न एकत्र केल्यास ते दरमहा सरासरी 35,000 डॉलर म्हणजेच 28,96,549 रुपये आहे. यामध्ये मुख्य काम वगळता इतर कामांतून मिळणारं उत्पन्न हे 8,27,292 रुपये आहे.’ याचाच अर्थ टोरेस यांना त्यांच्या साईड बिझनेसमधून दर महिन्याला 8 लाखांहून अधिक उत्पन्न मिळतं. एखाद्या कारणास्तव तुमची नोकरी गेली, तर तुम्ही साइड बिझनेस करा असंही म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"