शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

मोबाइलवरील गेमने विद्यार्थ्याचा मृत्यू?; ‘ब्लू व्हेल चॅलेंज’ कारणीभूत असल्याचा संशय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2024 06:41 IST

मॅसॅच्युसेट्स विद्यापीठातील २० वर्षीय प्रथम वर्षाचा विद्यार्थी ८ मार्च रोजी मृतावस्थेत आढळला होता

वॉशिंग्टन : अमेरिकेत गेम खेळत असताना एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना मार्च महिन्यातील असल्याचे सांगण्यात येत आहे. या विद्यार्थ्याच्या मृत्यूमागे ‘ब्लू व्हेल चॅलेंज’ हा ऑनलाइन गेम कारणीभूत असल्याचा संशय आहे. या खेळाला ‘सुसाइड गेम’ असेही म्हणतात.

मॅसॅच्युसेट्स विद्यापीठातील २० वर्षीय प्रथम वर्षाचा विद्यार्थी ८ मार्च रोजी मृतावस्थेत आढळला होता. ब्रिस्टल काउंटी डिस्ट्रिक्ट ॲटर्नीचे प्रवक्ते ग्रेग मिलियोट म्हणाले की, आत्महत्या केली असावी असा विचार करून तपास केला जात आहे. 

आत्महत्येसाठी प्रवृत्त भारत सरकारला ‘ब्लू व्हेल चॅलेंज’वर बंदी आणायची होती, परंतु त्याऐवजी मार्गदर्शक सूचना जारी करत हा विषय सोडून दिला होता. आयटी मंत्रालयाने २०१७ मध्ये जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, ब्लू व्हेल गेम आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करतो. त्यामुळे त्यापासून दूर राहा.

श्वास रोखून धरलासुरुवातीला विद्यार्थ्याची हत्या करून मृतदेह जंगलात फेकून दिल्याचे बोलले जात होते. विद्यार्थ्याच्या मृत्यूचे नेमके कारण पोलिसांनी अद्याप समोर आणलेले नाही. दोन मिनिटे विद्यार्थ्याचा श्वास रोखला होता. यामुळे त्याचा मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले.

काय असते गेममध्ये? ‘ब्लू व्हेल चॅलेंज’ हा एक ऑनलाइन गेम आहे, ज्यामध्ये खेळाडूला काहीतरी करण्याचे आव्हान दिले जाते. या गेममध्ये ५० स्तर आहेत, जे अधिकाधिक कठीण होत जातात. या प्रकरणी पोलिस म्हणाले की, आम्ही विद्यार्थ्याच्या अंतिम वैद्यकीय अहवालाची वाट पाहत आहोत. त्यानंतरच विद्यार्थ्याच्या मृत्यूबाबत काही सांगता येणार आहे. 

टॅग्स :Mobileमोबाइल