शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

‘एक दाम्पत्य, एक अपत्य’ धोरणाला चीनमध्येच फासला हरताळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2022 11:45 IST

१५ मुलांना जन्म दिलेल्या दाम्पत्यामुळे ११ अधिकारी निलंबित

बीजिंग : साम्यवादी चीनमधील  अनेक घटना तिथेच दाबल्या जातात. अशा घटनांना क्वचितच कधी पाय फुटून त्या जगासमोर येतात. अशीच एक घटना चीनमध्ये समोर आली आहे. ‘एक दाम्पत्य, एक अपत्य’ या कठोरपणे राबवल्या गेलेल्या धोरणाला एका दाम्पत्याने अक्षरशः हरताळ फासत तब्बल १५ अपत्यांना जन्म दिल्याने ११ सरकारी अधिकाऱ्यांना निलंबित व्हावे लागले आहे. 

एका दाम्पत्याने १९९५ ते २०१६ या कालावधीत १५ मुलांना जन्म दिला. दाम्पत्याने एकाच अपत्याला जन्म द्यावा, असे धोरण असतानाच्या काळात घडलेला हा प्रकार एका सरकारी  पाहणीमुळे उजेडात आला. 

लोकसंख्येचा समतोल ढळण्याची भीतीचीनची लोकसंख्या २०२१ साली १४१ कोटी होती. चीनचा जन्मदर गेल्या पाच वर्षांपासून सतत घटत आहे. त्यामुळे लोकसंख्येचा समतोल ढळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे आता प्रत्येक दाम्पत्याने दोन मुलांना जन्म द्यावा, असे चीनचे सरकारच सांगत आहे. 

सबसिडी योजनेचे लाभार्थीn ज्यांना १५ मुले आहेत, त्या दाम्पत्यातील पतीचे नाव लियांग असून, त्याचे वय ७६ वर्षांचे आहे, तर त्याची पत्नी लू हॉन्गलेन ही ४७ वर्षे वयाची आहे. n लियांग व लू यांची भेट सर्वप्रथम १९९४ साली गुआंग्डोंग येथे झाली. त्यानंतर त्यांनी विवाह केला; पण त्याची नोंदणी केली नाही. n हे दाम्पत्य गरिबांना मिळणाऱ्या सबसिडी योजनेचे २०१५ ते २०१९ या कालावधीत लाभार्थी होते. लियांग हे लू यांच्यापेक्षा ३० वर्षांनी मोठे आहेत. त्यांच्या १५ मुलांपैकी बहुतांश जणांचा जन्म घरीच झाला आहे.

... तर झाला असता कैक वर्षांचा तुरुंगवासचीनमध्ये ‘एक दाम्पत्य-एक अपत्य’ हे धोरण १९७९ सालापासून अमलात आले. जगात सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश अशी चीनची ओळख आहे. त्यामुळे लोकसंख्या नियंत्रणाचे धोरण आखण्यात आले. त्या काळात लियांग व लू यांनी नियम मोडल्याचे लक्षात आले असते, तर त्यांना कैक वर्षांचा तुरुंगवास झाला असता. चीनमध्ये २०१५ साली एक दाम्पत्य व त्यांची दोन मुले, असे धोरण अमलात आले.

टॅग्स :chinaचीन