शहरं
Join us  
Trending Stories
1
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
2
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
3
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
4
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
5
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
6
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
7
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
8
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
9
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
10
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
11
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
12
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
13
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
14
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
15
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
16
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
17
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
18
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
19
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
20
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?

ट्रम्पविरोधातील वक्तव्यामुळे 5 लाख कोटींचे नुकसान; युक्रेनला अमेरिकेचा आदेश ऐकावाच लागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 21:13 IST

अमेरिका युक्रेनवर सातत्याने दबाव टाकत आहे.

Russia-Ukraine War : दोन वर्षांपासून सुरू असलेले रशिया-यु्क्रेन युद्ध अंतिम टप्प्यात आले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न करत असून, यासाठी त्यांनी रशियासोबत चर्चाही सुरू केली आहे. पण, दुसरीकडे युक्रेनचा याला विरोध आहे. अमेरिका एका बाजूनेच निर्णय घेत असल्याचा आरोप युक्रेनचा आहे. अशा परिस्थितीत, अमेरिकाही युक्रेनवर सातत्याने दबाव टाकत आहे. दरम्यान, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोल्डोमीर झेलेन्स्की यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात दिलेल्या वक्तव्यावरुन अमेरिकेने त्यांची कोंडी केली आहे. 

अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार माईक वॉल्ट्ज यांनी म्हटले की, युक्रेन हे विसरत आहे की, त्यांना अमेरिकेसोबत 500 अब्ज डॉलर्स (सुमारे 5 लाख कोटी रुपये) च्या खनिज करारावर स्वाक्षरी करायची आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात विधाने करून काही उपयोग होणार नाही. युक्रेनने ट्रम्प यांचे म्हणणे मान्य करून तडजोड करावी, असे अमेरिकेने म्हटले आहे. युक्रेनने करारावर स्वाक्षरी न केल्यास, आम्ही पुढील योजनांबाबत बोलू, असेही वॉल्ट्झ यांनी म्हटले आहे.

ट्रम्प सतत दबाव टाकत आहेतअलीकडेच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी झेलेन्स्की यांना हुकूमशहा म्हटले होते. ट्रम्प म्हणाले होते की, झेलेन्स्की युक्रेनमध्ये निवडणुका घेत नाहीत आणि चुकीच्या पद्धतीने सत्तेवर बसले आहेत. ट्रम्प यांनी झेलेंक्सी यांचे अलोकप्रिय नेते, असेही वर्णन केले आहे. दुसरीकडे, झेलेन्स्की यांनी ट्रम्प यांच्याविरोधात आघाडी उघडताना त्यांना लबाड म्हटले. युक्रेन आणि रशिया यांच्यात लवकरच शांतता करार व्हावा यासाठी अमेरिका प्रयत्नशील आहे, मात्र आम्हाला विश्वास घेत नाहीत, असा आरोप युक्रेनचा आहे. पण, या करारासाठी ट्रम्प, युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांवर सातत्याने दबाव आणत आहेत. 

युक्रेनला काय हवे आहे?2014 पूर्वी रशियाच्या ताब्यात असलेला क्रिमिया युक्रेनला परत हवा आहे. याशिवाय, युक्रेनला युद्धादरम्यान रशियाने ताब्यात घेतलेले भागही परत हवे आहेत. याशिवाय, युक्रेनला लष्करी सरावावरही निर्बंध नको आहेत. युक्रेनच्या मागण्या मान्य होण्याची शक्यता नाही, त्यामुळे आता पुढे ट्रम्प आणि पुतिन काय पाऊल टाकतात, हे पाहणे महत्वाचे आहे.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाAmericaअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प