शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
2
संपादकीय: सनातन की संविधान? ही घटना किरकोळ ठरवून चालणार नाही...
3
आजचे राशीभविष्य- ८ ऑक्टोबर २०२५: सुंदर ठिकाणी फिरण्याचा योग, नोकरीत मिळेल बढती!
4
एक सेलेब्रिटी म्हणून त्या कंपनीसोबत जोडले गेले, मानधन मला मिळाले; ६० कोटींच्या घोटाळ्यावर शिल्पा शेट्टी काय म्हणाली...
5
छोट्या प्लाॅटधारकांची चिंता मिटली; मिळेल मालकी, तुकडेबंदी विनाशुल्क
6
हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ला स्थगिती नाही; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
7
नफ्यासाठी फिक्स होतो भारत विरुद्ध पाकिस्तान लढतींचा ड्रॉ! माइक आथर्टनचा ‘आयसीसी’वर आरोप
8
बिहारमध्ये पैशांचा पाऊस ठरणार का गेमचेंजर? महाराष्ट्रासारखेच निवडणुकीच्या तोंडावर सरकारी 'पॅकेज'
9
न्यायाधीशांच्या तोंडी शेऱ्यांचा सोशल मीडियात विपर्यास केला जात आहे; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली चिंता
10
टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील नियुक्त्यांवरून उफाळले तीव्र मतभेद; केंद्र सरकार हस्तक्षेप करण्याची शक्यता
11
माझे अनेक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती
12
सराव सामन्यात पृथ्वी शॉ मुंबईविरुद्ध तळपला, तंबूत जाता जाता भडकला...
13
जॉन क्लार्क, मिशेल देवोरेट अन् जॉन मार्टिनिस  यंदाचे भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते
14
रत्ने व आभूषण धोरण मंजूर, एक लाख कोटींची गुंतवणूक; पाच लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य
15
कर्जमाफीचे आश्वासन सरकार पूर्ण करणारच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा व्यक्त केला निर्धार 
16
आरक्षण, नोकरीसाठी आत्महत्येची चिठ्ठी अंगलट; तीन विविध समाजांची प्रकरणे : तिघांवर गुन्हा
17
आका मंत्रिमंडळात आहे का? पाटोळेंच्या अटकेवरून मित्रपक्ष व विरोधकांकडून शिंदेसेना लक्ष्य
18
विषारी ‘कफ सिरप’मुळे मृत्यूचे थैमान; १६ तासांत ३ बालकांचा बळी; मृतांची संख्या १६ 
19
वर्धा-भुसावळ, गोंदिया-डोंगरगड रेल्वे मार्ग मंजूर; २४,६३४ कोटी खर्चाच्या चार प्रकल्पांना केंद्राची मंजुरी
20
नवी मुंबई विमानतळ, भुयारी मेट्रोचे पंतप्रधानांच्या हस्ते आज लोकार्पण

सुलेमानी यांच्या अंत्ययात्रेत चेंगराचेंगरी; ५६ मृत्युमुखी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2020 06:18 IST

इराणचे कमांडर जनरल सुलेमानी यांच्या अंत्ययात्रेला १५ लाखांहून अधिक लोक जमले होते.

तेहरान : इराणचे कमांडर जनरल सुलेमानी यांच्या अंत्ययात्रेला १५ लाखांहून अधिक लोक जमले होते. अंत्ययात्रेच्या वेळी प्रचंड चेंगराचेंगरी झाली. त्यात ५६ जण मरण पावले असून, २०० जण जखमी झाले आहेत. इराणचे कमांडर जनरल सुलेमानी यांच्या अंत्ययात्रेत करमान येथे मोठा जनसमुदाय उसळला होता. चेंगराचेंगरी का झाली? याबाबत माहिती मिळू शकली नाही. आॅनलाइन पोस्ट करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये रस्त्यांवर मृतदेह पडलेले दिसून येत नव्हते. तर, अन्य लोक मदत मागत होते. अंत्यसंस्कारासाठी १५ लाख लोक एकत्र आले होते असे सांगितले जात आहे.इराकने आपल्या देशातील अमेरिकन सैन्याने माघारी निघून जावे, असा ठराव पार्लमेंटमध्ये केला असला तरी आम्ही सैन्य बिलकुल मागे घेणार नाही, असे अमेरिकेच्या संरक्षण सचिवांनीही जाहीर केले आहे. परिणामी हा तिढा सुटण्याची शक्यता नाही, असे जाणकारांचे म्हणणेआहे.कासीम सुलेमानी यांची अमेरिकेने हवाई हल्ल्याद्वारे हत्या केल्याने इराणमध्ये कमालीची संतापाची लाट आहे. सुलेमानी यांचे इराण व आसपासच्या देशांत वाढणारे प्रस्थ अमेरिकेला खुपत होते. त्यामुळेच त्यांची हत्या करण्यात आली.एरवी अमेरिकेला थेट दुखावण्याचा सुलेमानी यांनी प्रयत्नही केला नव्हता; पण इराणमधील सत्ताधारी व लष्करप्रमुख आपल्याला सोयीचा असावा, अशी अमेरिकेची इच्छा होती. त्यापुढे इराण न झुकल्यानेच सुलेमानी यांना मारण्यात आले, अशी इराणमधील सर्वसामान्यांची धारणा आहे.इराणचे सरकार वा लष्करच नव्हे, तर सामान्य जनताही अमेरिकेचा बदला घेण्याची भाषा करीत आहे.ट्रम्प यांच्या शिरच्छेदासाठी आम्ही कोणतीही किंमत मोजायला तयार आहोत, अशी भाषा इराणमध्ये सुरू झाली आहे. त्या जनतेला शांत करणे, हे इराण सरकारपुढील आव्हान असणार आहे; पण आम्हाला धमक्या देण्याच्या फंदात पडू नका, असा इशारा इराणचे सर्वोच्च प्रमुख अयातोल्ला अली खामेनी यांनी दिला आहे. (वृत्तसंस्था)>इराणमध्ये अण्वस्त्रे ठेवूच देणार नाही -ट्रम्पइराणचे कमांडर मेजर जनरल कासीम सुलेमानी यांच्या हत्येनंतर इराणने संपूर्ण अमेरिकेच्या लष्करालाच दहशतवादी ठरविले आहे, तसेच नवीन कमांडर मेजर जनरल इस्माईल घनी यांनी अमेरिकेचा पाठिंबा असलेल्या सर्व जागा पेटवून टाकण्याची धमकी दिली आहे.दुसरीकडे इराणमध्ये अण्वस्त्रे ठेवूच देणार नाही, असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिका व इराणमधील संघर्ष अधिक वाढेल आणि बराच काळ सुरू राहील, असे दिसू लागले आहे.इराणच्या अण्वस्त्र ठिकाणांवर अमेरिका हल्ले करणार की काय, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे. तसे झाल्यास मध्य आशियाला महायुद्धाचे चटकेच बसतील.

टॅग्स :qasem soleimaniकासीम सुलेमानी