शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

श्रीलंकेत सरकारविरोधात निदर्शने सुरूच; 54 जणांना अटक, 600 वकील त्यांच्या सुटकेसाठी पोहोचले कोर्टात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2022 11:40 IST

srilanka economic crisis : लोकांमध्ये आता आणीबाणी (Sri Lanka Emergency) आणि कर्फ्यूची (Sri Lanka Curfew) भीती दिसून येत नाही.

कोलंबो : श्रीलंकेतील सध्याची परिस्थिती (Sri Lanka Crisis)अतिशय तणावपूर्ण आहे. देश आर्थिक, राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या पूर्णपणे अस्थिर झाला आहे. पुढे काय होणार हे कोणालाच माहीत नाही. अशा परिस्थितीत जनता संतापाने रस्त्यावर आली आहे. लोकांमध्ये आता आणीबाणी (Sri Lanka Emergency) आणि कर्फ्यूची (Sri Lanka Curfew) भीती दिसून येत नाही.

आंदोलन करणाऱ्या ५४ लोकांना सोडविण्या साठी ६०० वकील कोर्टात पोहोचले. अशा परिस्थितीत कोर्टाने ४८ लोकांना जेलमधून सुटका करण्याचे आदेश दिले. राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे यांनी विरोधकांना या परिस्थितीला सामोरे जाण्याचे आवाहन केले आहे. मात्र, विरोधकांनी आंदोलन थांबवण्यासाठी नकार दिला आहे.

श्रीलंकेतील लोक एका आठवड्याहून अधिक काळापासून सरकारविरोधात सातत्याने निदर्शने करत आहेत. सोमवारी झालेल्या आंदोलनादरम्यान दगडफेक आणि वाहनांची जाळपोळ करण्यात आली. या हिंसाचारात ५ पत्रकार आणि अनेक आंदोलक जखमी झाले आहेत. येथून पोलिसांनी 54 आंदोलकांना अटक केली. मात्र, कोर्टाच्या आदेशानंतर ४८ जणांची सुटका करण्यात आली.

आपत्कालीन आरोग्य स्थिती घोषितमंगळवारी देशात आपत्कालीन आरोग्य स्थिती घोषित करण्यात आली आहे. रुग्णांच्या जीविताच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. याआधीही फेब्रुवारी महिन्यात सरकारने सार्वजनिक आरोग्य सेवा अत्यावश्यक सेवा म्हणून घोषित केली होती. औषधांसोबतच श्रीलंकेतील नागरिक विजेसारख्या सुविधांसाठीही झगडत आहेत.

चार मंत्र्यांची नियुक्ती श्रीलंकेच्या विरोधकांनी राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे यांचे सरकारमध्ये सामील होण्याचे आमंत्रण नाकारले आणि देशातील अन्न, इंधन आणि औषधांच्या वाढत्या टंचाईवर विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. यानंतर पूर्ण मंत्रिमंडळाची नियुक्ती होईपर्यंत राष्ट्रपती राजपक्षे संसदेची वैधता आणि स्थिरता राखण्यासाठी चार मंत्र्यांची नियुक्ती केली आहे.

सोशल मीडियावरील बंदीमुळे तरुणांमध्ये संतापसरकारने सोशल मीडियावर बंदी घातली असून, त्यामुळे तरुणांमध्ये संताप वाढत आहे. सरकार जितके कठोर होत आहे, तितकाच लोकांचा रोष वाढत आहे. #GoHomeGota हॅशटॅग ट्रेंड करत आहे. सोशल मीडियावर बंदी असतानाही लोक वेगवेगळ्या प्रकारे ऑनलाइन येत आहेत आणि चर्चा करत आहेत.

टॅग्स :Sri Lankaश्रीलंकाInternationalआंतरराष्ट्रीय