कोलंबो : श्रीलंकेचे वादग्रस्त पंतप्रधान महिंदा राजपक्षे हे आज आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत. त्यामुळे या देशात गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेला राजकीय संघर्ष संपुष्टात येण्याची शक्यता आहे.त्यांना पंतप्रधान म्हणून काम करण्यास सर्वोच्च न्यायालयाने बंदी केली असून खटल्याची सुनावणी पूर्ण होईपर्यंत त्या आदेशात बदल करण्यास नकार दिला आहे. दरम्यान, त्यांच्या निवडीने घटनात्मक पेचप्रसंग निर्माण झाला होता. (वृत्तसंस्था)
श्रीलंकेचे पंतप्रधान आज राजीनामा देणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2018 05:21 IST