शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

श्रीलंकेच्या राष्ट्रपतींना झटका; पंतप्रधान राजपक्षेंविरोधात अविश्वास ठराव मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2018 12:56 IST

सर्वोच्च न्यायालयापाठोपाठ संसदेचा राष्ट्रपतींना धक्का

कोलंबो: सर्वोच्च न्यायालयानंतर श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाल सिरिसेना यांना आज आणखी एक धक्का बसला आहे. श्रीलंकेच्या संसदेनं नवनियुक्त पंतप्रधान महिंद्रा राजपक्षे यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव मंजूर केला आहे. विरोधकांनी राजपक्षे सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला होता. त्यावर आज मतदान झालं. यामुळे सिरिसेना यांना मोठा झटका बसला आहे. पंतप्रधान महिंद्रा राजपक्षे यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्तावाला संसदेनं मंजुरी दिल्याची घोषणा सभापती कारु जयसूर्या यांनी केली. 'सरकारविरोधात विरोधकांनी अविश्वास प्रस्ताव आणला. त्यावर आवाजी मतदान घेण्यात आलं. त्यात संसदेनं सरकारविरोधात मतदान केलं. त्यावेळी राजपक्षे समर्थक संसदेबाहेर घोषणाबाजी करत होते. सरकारविरोधात अविश्वास ठराव मंजूर झाला आहे,' असं जयसूर्या यांनी सांगितलं.  काल राष्ट्रपती मैत्रीपाल सिरिसेना यांना सर्वोच्च न्यायालयानं धक्का दिला होता. संसद भंग करण्याचा सिरिसेना यांच्या आदेशाविरोधात न्यायालयानं निकाल दिला. सिरिसेना यांच्याकडून सुरू असलेल्या निवडणुकीच्या तयारीलादेखील न्यायालयानं ब्रेक लावला. सिरिसेना यांनी 26 ऑक्टोबरला पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांना पदावरुन हटवलं. यानंतर त्यांनी राजपक्षे यांची अध्यक्षपदी नियुक्ती केली. 

टॅग्स :Sri Lankaश्रीलंकाPoliticsराजकारण