शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

Sri Lanka Crisis: चीन नाही, अखेर भारतच श्रीलंकेच्या मदतीला धावला; अन्नधान्याचे ट्रकचे ट्रक लोड होतायत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2022 14:17 IST

Sri Lanka Crisis India help: श्रीलंकेत सध्या सर्व जीवनावश्यक वस्तूंचा मोठा तुटवडा आहे. एक किलो तांदळासाठी लोकांना पाचशे श्रीलंकन ​​रुपये मोजावे लागतात आणि साखरेच्या बाबतीतही तेच आहे. फळे आणि भाजीपाला आवाक्याबाहेर गेला आहे. भाज्यांचे भाव हजारो रुपयांवर पोहोचले आहेत.

गेल्या काही काळापासून श्रीलंका, नेपाळसारख्या देशांना भारतापासून तोडण्यासाठी चीन मोठमोठी मदत करण्याची आश्वासने देत होता. ही मदत नव्हती तर ते कर्ज होते. त्या कर्जाच्या खाईत एकदा का हे देश आले की त्यांची पाकिस्तानसारखी अवस्था करायची आणि आपल्या तालावर नाचवायचे हा चीनचा इरादा होता. श्रीलंकेला वेळोवेळी भारतानेच मदत केली होती. तेथील लष्करी मदत असो की कोणत्या नैसर्गिक संकटातील मदत असो, भारत नेहमीच त्यांच्या मदतीला गेला आहे. 

Sri Lanka Crisis: सोन्याची लंका महागाईत कोणी जाळली, व्हिलन कोण?; चार भावांनी केले कंगालसध्या श्रीलंका मोठ्या आर्थिक संकटात आहे. लोकांना अन्नधान्य मिळत नाहीय. तेथील चलन आता कचरा झाले आहे. मोठमोठी रक्कम मोजूनही लोकांना वस्तू खरेदी करता येत नाहीएत. तर अनेकांकडील पैसे संपत आलेत. उपाशीपोटी रहावे लागत आहे. अशावेळी भारताने मदतीचा मोठा हात देऊ केला आहे. 

श्रीलंकेतील लोकांना पाठविण्यासाठी भारतात व्यापाऱ्यांनी ट्रकचे ट्रक लोड करण्यास सुरुवात केली आहे. ४० हजार टन तांदूळ भरला जात आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री गेल्याच आठवड्यात श्रीलंकेला गेले होते. तेथे त्यांनी १अब्ज डॉलरची क्रेडिट लाईन देण्याचे आश्वासन दिले होते. भारतात येताच त्यातील  पहिली मदत देण्याची तयारी सुरु केली आहे. 

श्रीलंकेमध्ये मोठा सण साजरा केला जाणार आहे, त्या आधीच ही मदत तिथे पोहोचविली जाणार आहे. परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागल्याने तेथील सरकारने आणीबाणी लादली आहे. याचबरोबर दुसऱ्या देशांकडून अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी भारत श्रीलंकेला पैशांच्या बाबतीतही मदत करणार आहे. भारताने पाठविलेला तांदूळ पोहोचला की तेथील तांदळाचे जे दुप्पट-तिप्पट झालेले दर कमी होण्याची शक्यता आहे. 

श्रीलंकेत सध्या सर्व जीवनावश्यक वस्तूंचा मोठा तुटवडा आहे. एक किलो तांदळासाठी लोकांना पाचशे श्रीलंकन ​​रुपये मोजावे लागतात आणि साखरेच्या बाबतीतही तेच आहे. फळे आणि भाजीपाला आवाक्याबाहेर गेला आहे. भाज्यांचे भाव हजारो रुपयांवर पोहोचले आहेत.

टॅग्स :Sri Lankaश्रीलंका