शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

Sri Lanka Crisis : श्रीलंकेत आणीबाणी लागू, राष्ट्राध्यक्षांच्या पलायनामुळे संताप; अनेक ठिकाणी कर्फ्यू

By जयदीप दाभोळकर | Updated: July 13, 2022 13:10 IST

Sri Lanka Crisis : देशात आणीबाणी जाहीर करण्यात आल्याची माहिती श्रीलंकेच्या पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आली. बुधवारी शेकडो आंदोलक पंतप्रधानांच्या निवासस्थानी पोहोचले होते.

Sri Lanka Crisis : राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांच्या पलायनानंतर श्रीलंकेतील परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. दरम्यान, श्रीलंकेत आता आणीबाणी लागू करण्यात आली आहे. यासोबतच पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांच्याकडे काळजीवाहू राष्ट्रध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. श्रीलंकेची राजधानी कोलंबोतील परिस्थितीही नियंत्रणाबाहेर जात आहे. लोक विक्रमसिंघे यांच्या राजीनाम्याचीही मागणी करत आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने पंतप्रधानांच्या निवासस्थानी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनाही जमावाविरोधात अश्रुधुराचा वापर करावा लागल्याची माहिती समोर आली आहे.

विक्रमसिंघे यांनी काळजीवाहू राष्ट्राध्यक्ष म्हणून देशात आणीबाणी लागू केली आहे. तसंच प्रश्चिम प्रांतात कर्फ्यू लागू केला आहे, अशी माहिती विक्रमसिंघे यांच्या प्रवक्त्यांकडून देण्यात आली. बुधवारी मोठ्या प्रमाणात आंदोलक पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर पोहोचले. पंतप्रधान आणि राष्ट्राध्यक्ष दोघांनीही सरकारच्या बाहेर राहावं अशी लोकांची मागणी असल्याचं श्रीलंकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या माजी सल्लागारांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं. "पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा अशी त्यांची मागणी आहे. संविधानानुसार जर राष्ट्राध्यक्षांनी राजीनामा दिला, तर पंतप्रधान काळजीवाहू राष्ट्राध्यक्ष बनतात. लोकांना ते दोघंही पगावर नको आहेत. पोलिसांनी अश्रूधुराचा मारा करत कारवाई केली आहे," असं त्यांनी सांगितलं. कोलंबोमध्ये वाढता विरोध पाहता सुरक्षा दलाच्या जवानांनी हवाई गस्त सुरू केली आहे. तसंच पंतप्रधान कार्यालयाच्या बाहेर सुरक्षाही वाढवण्यात आली आहे. श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष विना राजीनामा स्वाक्षरी केल्याशिवाय देश सोडून गेले आहे. अध्यक्ष आणि संपूर्ण देशाला ते व्यवस्थितरित्या राजीनामा देतील अशी अपेक्षा आहे. जेणेकरून पुढील आढवड्यात राष्ट्रपतिपदाची निवडणूक घेता येईल. हे संसदेवर अवलंबून आहे, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षाचे खासदार पताली चंपिका रणवाका यांनी दिली.

टॅग्स :Sri Lankaश्रीलंकाprime ministerपंतप्रधानEconomyअर्थव्यवस्था