कोलंबो - श्रीलंकेत निर्माण झालेल्या राजकीय अस्थिरतेदरम्यान सोमवारी न्यायालयाने पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांना जबरदस्त धक्का दिला आहे. न्यायालयाने अंतरिम निर्णय देताना राजपक्षे आणि त्यांच्या मंत्रिमंडळाच्या काम करण्याला स्थगिती दिली आहे. त्यामुळे श्रीलंकेमधील राजकीय संकट अधिकच गहिरे झाले आहे. न्यायालयाचा हा निर्णय श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रिपाल सिरिसेना यांच्यासाठी धक्का मानला जात आहे. सिरिसेना यांनीच रानिल विक्रमसिंघे यांना पदावरून दूर करून राजपक्षे यांची पंतप्रधानपदी नियुक्ती केली होती. राष्ट्रपतींनी नियुक्त केलेल्या या वादग्रस्त सरकाराविरोधात 122 खासदारांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेला उत्तर देताना न्यायालयाने हा निर्णय दिला. आता या प्रकरणाची सुनावणी 12 आणि 13 डिसेंबर रोजी होणार आहे.
न्यायालयाचा महिंदा राजपक्षेंना धक्का, पंतप्रधान म्हणून काम करण्यास स्थगिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2018 19:59 IST
श्रीलंकेत निर्माण झालेल्या राजकीय अस्थिरतेदरम्यान सोमवारी न्यायालयाने पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांना जबरदस्त धक्का दिला आहे.
न्यायालयाचा महिंदा राजपक्षेंना धक्का, पंतप्रधान म्हणून काम करण्यास स्थगिती
ठळक मुद्देश्रीलंकेत निर्माण झालेल्या राजकीय अस्थिरतेदरम्यान सोमवारी न्यायालयाने पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांना जबरदस्त धक्का दिला आहे.न्यायालयाने अंतरिम निर्णय देताना राजपक्षे आणि त्यांच्या मंत्रिमंडळाच्या काम करण्याला स्थगिती दिली आहे.