शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

श्रीलंकेतही बुरखा घालण्यावर निर्बंध लागणार; १ हजारांपेक्षा अधिक इस्लामिक शाळांवरही बंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2021 17:47 IST

Sri Lanka : महिंदा राजपक्षे सरकारमधील एका मंत्र्यानं शनिवारी याबाबत केली घोषणा, यापूर्वी कोरोनानं मृत्यू झालेल्या मुस्लीम नागरिकांच्या शरीराला दफन करण्यावरही होती बंदी

ठळक मुद्देमहिंदा राजपक्षे सरकारमधील एका मंत्र्यानं शनिवारी याबाबत केली घोषणायापूर्वी कोरोनानं मृत्यू झालेल्या मुस्लीम नागरिकांच्या शरीराला दफन करण्यावरही होती बंदी

धार्मिक कट्टरतावादाचा सामना करणाऱ्या श्रीलंकेत आता बुरखा परिधान करण्यावर निर्बंध घातले जाणार आहेत. महिंदा राजपक्षे यांच्या सरकारमधील एका मंत्र्यानं शनिवारी श्रीलंका लवकरच बुरख्यावर निर्बंध घालणार असल्याची माहिती दिली. याव्यतिरिक्त १ हजार इस्लामी शाळादेखील बंद केल्या जाणार असल्याचं त्यांनी नमूद केलं. काही दिवसांपूर्वी स्वित्झर्लंडमध्येही जनमत संग्रह करण्यात आला होता. त्यानंतर त्या ठिकाणी तोंड झाकून सार्वजनिक ठिकाणी वावरण्यास निर्बंध घालण्यात आले होते. श्रीलंकेचे सार्वजनिक सुरक्षा मंत्री सरथ वेरासेकेरा यांनी दिलेल्या माहितीनुसार मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठई एका विधेयकावर स्वाक्षरी केल्याचं त्यांनी सांगितलं. या विधेयकात राष्ट्रीय सुरक्षेच्या आधारावर मुस्लीम महिलांना बुरखा परिधान करण्यावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे. जर विधेयक मंत्रिमंडळात मंजूर करण्यात आलं तर श्रीलंकेची संसद यावर कायदा करू शकते, असंही त्यांनी नमूद केलं. मदरशांवरही बंदीसरकार एक हजारांपेक्षा अधिक मदरसे इस्लामिक शाळांवरही बंदी घालण्याच्या तयारीत आहे. श्रीलंकेच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची हे मदरसे पायमल्ली करत असल्याचंही वेरासेकेरा यांनी सांगितसं. कोणीही शाळा सुरू करू शकत नाही आणि जे काही तुम्हाला हवंय ते तुम्ही मुलांना शिकवू शकत नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

मंत्री म्हणाले धार्मिक दहशतवादाचा संकेत"यापूर्वी मुस्लीम महिला आणि तरूणी या बुरखा परिधान करत नव्हत्या. सध्या वर येत असलेल्या धार्मिक दहशतवादाचा हा संकेत आहे. आम्ही निश्चितच यावर बंदी घालणार आहोत," असंही सरथ वेसासेकेरा म्हणाले. २०१९ मध्ये श्रीलंकेतील चर्च आणि हॉटेलांमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर काही काळासाठी श्रीलंकेत बुरखा परिधान करण्यावर निर्बंध घालण्यात आले होते. या हल्ल्यात २५० जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर श्रीलंकेनं अनेक आरोपींची अटकही केली होती. दफन करण्यावरही होते निर्बंधश्रीलंकेत कोरोना महासाथीच्या दरम्यान कोरोनाची बाधा झाल्यानं मृत्यू झालेल्या मुस्लीम नागरिकांच्या मृत शरीराला दफन करण्यावरही बंदी घालण्यात आली होती. त्यावेळी देशातील अनेक मुस्लीम नागरिकांना या निर्णयाचा विरोध केला होता. त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचलं होतं. परंतु हा निर्णय बदलण्यात आला नव्हता. यानंतर अमेरिका आणि आंतरराष्ट्रीय अधिकार समूहांच्या टीकेनंतर श्रीलंकेच्या सरकारनं या वर्षाच्या सुरूवातीला हे निर्बंध हटवले.

टॅग्स :Sri Lankaश्रीलंकाMuslimमुस्लीमIslamइस्लामParliamentसंसद