शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

गुड न्यूज! Omicron व्हेरिअंटच्या प्रत्येक म्यूटेशनवर प्रभावी आहे 'हे' औषध; ब्रिटिश शास्त्रज्ञाचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2021 15:07 IST

Omicron Variant : कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे हे औषध म्हणजे एक मोनोक्लोनल अँटीबॉडी आहे. हे औषध मानवाने आधीच तयार केलेल्या नैसर्गिक अँटीबॉडीवर आधारलेले आहे.

संपूर्ण जगात दहशत निर्माण करणाऱ्या ओमायक्रॉन व्हेरिअंटसंदर्भात एका ब्रिटीश शास्त्रज्ञाने मोठा दावा केला आहे. त्यांचे औषध सॉट्रोविमॅब (Sotrovimab) हे ओमायक्रॉनच्या प्रत्येक म्यूटेशनवर प्रभावी असल्याचे सिद्ध झाल्याचे म्हणण्यात आले आहे. हे औषध ग्लॅक्सोस्मिथक्लाइन (जीएसके)ने यूएस पार्टनर वीर (व्हीआयआर) बायोटेक्नोलॉजीसोबत एकत्रितपणे तयार केले आहे. आता हे औषध ओमाक्रॉन व्हेरिअंटवर प्रभावी असल्याचे मानले जाते.

जारी केलेल्या निवेदनात, कंपनीने दावा केला आहे की त्यांचे औषध सॉट्रोविमॅब ओमायक्रॉनच्या 37 म्यूटेशन्सविरोधात प्रभावी ठरले आहे. गेल्या आठवड्यातही, प्री-क्लिनिकल चाचण्यांनंतर, सांगण्यात आले होते की, सोट्रोविमॅब औषध ओमायक्रॉन विरोधात काम करते. याच बरोबर कंपनीने जोर देऊन सांगितले, की हे औषध WHO ने नमूद केलेल्या प्रत्येक व्हेरिअंटवर प्रभावीपणे काम करते.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे हे औषध म्हणजे एक मोनोक्लोनल अँटीबॉडी आहे. हे औषध मानवाने आधीच तयार केलेल्या नैसर्गिक अँटीबॉडीवर आधारलेले आहे. यामुळे हे इतर औषधींपेक्षा अधिक प्रभावी मानले जाते. खरे तर कंपनीच्या या दाव्याने संपूर्ण जगाला एक आशेचा किरण नक्कीच दाखवला आहे. मात्र, आतापर्यंत या औषधाचे जे परिणाम समोर आले आहेत, ते कुठल्याही मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेले नाहीत. यामुळे, या औषधाची औपचारीक घोषणा होणे अद्याप बाकी आहे.

रिसर्चमध्ये समोर आली अशी माहिती - कंपनीने म्हटले आहे, की सॉट्रोविमॅब औषधानंतर हॉस्पिटलायझेशन बऱ्याच मोठ्या प्रमाणावर कमी केले जाऊ शकते. सुरुवातीच्या टेस्टनंतर म्हणण्यात आले आहे, की हॉस्पिटलायझेशन 79 टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकते. तसेच याच औषधामुळे जो व्हायरस तयार होतो, तो ह्यूमन सेल्समध्ये जाऊ शकत नाही आणि माणवाच्या जीवाला धोका निर्माण होत नाही. 

टॅग्स :Omicron Variantओमायक्रॉनcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या