शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

सोमालिया पुन्हा एकदा बॉम्बस्फोटानं हादरलं, 14 जणांचा मृत्यू, 16 जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2017 10:41 IST

मोगादिशू- सोमालियातल्या एका प्रसिद्ध हॉटेलच्या बाहेर एका संशयित कारमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणला आहे. या बॉम्बस्फोटात 14 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 16हून अधिक जण जखमी आहे.

मोगादिशू- सोमालियातल्या एका प्रसिद्ध हॉटेलच्या बाहेर एका संशयित कारमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणला आहे. या बॉम्बस्फोटात 14 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 16हून अधिक जण जखमी आहे. या बॉम्बस्फोटानंतर परिसरात दुस-या एका ठिकाणीही गोळीबाराचा आवाज ऐकू आला. पहिला बॉम्बस्फोटात दहशतवाद्यानं स्वतःला उडवून घेतलं. तर राष्ट्रपती निवासाजवळ असलेल्या नासा-हब्लोद हॉटेलच्या वरच्या मजल्यावर दहशतवादी लपून बसले असून, सुरक्षा दलाच्या जवानांशी त्यांची चकमक सुरू आहे, अशी माहिती पोलीस अधिकारी कॅप्टन मोहम्मद हुसैन यांनी दिली आहे.पहिल्या मजल्यावर पाचमधील दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. नासा- हब्लोद हॉटेलच्या आतून गोळीबाराचा आवाज येत आहे, अशी माहितीही त्या अधिका-यानं दिली आहे. या बॉम्बस्फोटाच्या दोन आठवड्यांआधी मोगादिशूमध्ये ट्रक बॉम्बचा स्फोट झाला होता. ज्यात 350हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. सोमालियाची राजधानी मोगादिशूमध्ये हा सर्वात शक्तीशाली स्फोट घडवून आणला होता. एका हॉटेल आणि बाजाराच्या बाहेर झालेल्या स्फोटात 350 लोकांचा मृत्यू झाला आहे तर 300 लोक जखमी होते. गेल्या तीन दशकातील हा सर्वात शक्तीशाली स्फोट असल्याचं बोललं जातं आहे. हा स्फोट इतका भीषण होता की घटनास्थळापासून 100 ते 150 मीटरच्या परिघात उपस्थित असलेले नागरिकही मृत्युमुखी पडले.सोमालियाच्या परराष्ट्र मंत्रालयाला लक्ष्य करण्याचा दहशतवाद्यांचा हेतू होता. एका ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणावर बॉम्बसाठा ठेवून तो एका गजबजलेल्या रस्त्यावर सोडण्यात आला.सोमालियाचे नेते अब्दीरहमान उस्मान यांनी या घटनेला अतिभयंकर असं म्हटलं आहे. तुर्की आणि केनियासह अनेक देशांतून जखमींवर उपचारासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. परराष्ट्र मंत्रालयासह महत्त्वपूर्ण मंत्रालयाच्या जवळील रस्त्यांवर निशाणा साधत हा ट्रक बॉम्ब स्फोट झाल्यानंतर हॉस्पिटलमध्ये मोठी गर्दी झाली होती.स्फोट झालेल्या ठिकाणी संतप्त नागरिकांनी गर्दी केली होती. तर सोमालिया सरकारने या स्फोटाला राष्ट्रीय संकट जाहीर केलं आहे. अल-कायदाशी संबंधित समूह अल-शबाबला या स्फोटासाठी सरकारने जबाबदार ठरवलं आहे. आफ्रिकेतील या घातक समूहाने याआधी अनेक वेळा राजधानी मोगादिशूमधील महत्त्वाच्या ठिकाणांवर निशाणा साधला होता. पण आत्तापर्यंत या स्फोटाबाबतील या समूहाने कुठलीही माहिती दिलेली नाही.

टॅग्स :Blastस्फोट