शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

सोशल दुनियेतील टिवटिव झाली दहा वर्षांची!

By admin | Updated: March 22, 2016 04:18 IST

अवघ्या १४० अक्षरांमध्ये युझर्सना आपल्या भावना पोहोचवायला लावणाऱ्या, प्रसिद्ध सोशल नेटवर्किंग साईट्सपैकी एक, तुमच्या आमच्या सगळ्यांच्या लाडक्या ‘ट्विटर’ला सोमवारी १० वर्षे पूर्ण झाली.

वॉशिंग्टन : अवघ्या १४० अक्षरांमध्ये युझर्सना आपल्या भावना पोहोचवायला लावणाऱ्या, प्रसिद्ध सोशल नेटवर्किंग साईट्सपैकी एक, तुमच्या आमच्या सगळ्यांच्या लाडक्या ‘ट्विटर’ला सोमवारी १० वर्षे पूर्ण झाली. २१ मार्च २००६ साली ट्विटरचा सहसंस्थापक जॅक डॉर्सीने पहिले ट्विट केले होते. ‘ट्विटर’च्या दशकपूर्तीनिमित्त सकाळपासून लाखो युजर्सनी शुभेच्छा दिल्या असून ट्विटरनेही व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचे आभार मानले आहेत. #LoveTwitterl हा हॅशटॅगही आज ट्रेंडिगमध्ये अव्वल स्थानावर आहे. > बिझ स्टोन, ईव्हान विलियम्स आणि जैक डॉर्सी या तिघांनी मिळून अमेरिकेच्या आॅस्टिन शहरात ही कंपनी सुरू केली. ‘जस्ट सेंटिग अप माय ट्विटर’ असे पहिले ट्विट जॅक डॉर्सीने २१ मार्च २००६ ला केले आणि ट्विटरचा उदय झाला. > ट्विटरचे प्रतिस्पर्धी : गेल्या दशकभरापासून प्रसिद्ध असलेल्या ट्विटरची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच असली तरी आजच्या स्पर्धेच्या युगात ट्विटरलाही प्रतिस्पर्ध्यांचा सामना करावा लागत आहे. ट्विटरप्रमाणेच आजच्या पिढीत लोकप्रिय असलेली आणखी एक सोशल नेटवर्किंग साईट म्हणजे फेसबुक आणि हीच साईट ट्विटरची प्रतिस्पर्धी आहे. प्रसिद्ध सोशल नेटवर्किंग साईटस्च्या यादीत फेसबुक १०० कोटींहून अधिक युजर्ससह अव्वल क्रमांकावर असून फेसबुकनेच विकत घेतलेले इन्स्टाग्राम ४० कोटी युजर्ससह दुसऱ्या स्थानावर आहे. या यादीत ट्विटरचा तिसरा क्रमांक लागतो.> कोणत्याही सोशल नेटवर्किंग साईटचे यश मोजण्याचा मापदंड म्हणजे, त्यांचे मंथली अ‍ॅक्टिव्ह युजर्स. ट्विटरच्या माहितीनुसार, गेल्या ६ महिन्यांत ३० कोटींहून अधिक अ‍ॅक्टिव्ह युजर्स असून अमेरिकेबाहेर ट्विटरचे २५ कोटी अ‍ॅक्टिव्ह युजर्स आहेत.