शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

...तर भाजपचा पराभव शक्य, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अमेरिकेतील कार्यक्रमात व्यक्त केला विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2023 11:33 IST

कर्नाटकातील विजयाचा पाया ‘भारत जोडो यात्रे’च्या माध्यमातून घातला गेल्याचं केलं वक्तव्य.

सांता क्लारा (अमेरिका) : भारतातील आगामी सार्वत्रिक निवडणुकांमध्ये जर विरोधकांची योग्यरीत्या एकजूट झाली तर  केंद्रातील सत्ताधारी भाजपचा पराभव होऊ शकतो, असा विश्वास काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी येथे अनिवासी भारतीयांच्या मेळाव्याला संबोधित करताना व्यक्त केला.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या विजयाचा संदर्भ देत राहुल गांधी म्हणाले की, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी त्यांचा पक्ष या संदर्भात काम करत आहे आणि याबाबत योग्य दिशेने वाटचाल करीत आहे. मंगळवारी कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या सिलिकॉन व्हॅली कॅम्पसमधील एका कार्यक्रमात प्रश्नांची उत्तरे देताना गांधी म्हणाले की, एक राजकारणी म्हणून मी भाजपचा कमकुवतपणा स्पष्टपणे पाहू शकतो... जर विरोधी पक्ष योग्य पद्धतीने तयार झाला तर भाजपचा पराभव होऊ शकतो. कर्नाटकमध्ये काँग्रेसने निवडणुका लढण्यासाठी पूर्णपणे वेगळा दृष्टिकोन स्वीकारला, कर्नाटकातील विजयाचा पाया ‘भारत जोडो यात्रे’च्या माध्यमातून घातला गेला.

पंतप्रधान देवालाही समजावून सांगतील...भारतात असे लोक आहेत ज्यांना वाटते की, ते देवापेक्षा जास्त जाणतात आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्याचे उदाहरण आहेत, अशी टीका राहुल गांधी यांनी कॅलिफोर्निया येथे अमेरिकी इंडियन ओव्हरसीज काँग्रेसद्वारे आयोजित ‘मोहब्बत की दुकान’ कार्यक्रमात केली. ‘हे लोक इतिहासकारांना इतिहास, शास्त्रज्ञांना विज्ञान आणि सैन्याला युद्ध कसे लढायचे ते सांगू शकतात. मुद्दा असा आहे की, ते ऐकायला तयार नाहीत. जर तुम्ही मोदीजींना देवाजवळ बसवले तर ते देवाला समजावून सांगतील की, हे विश्व कसे चालते आणि देवालाही आश्चर्य वाटेल की, मी काय निर्माण केले आहे!’

धक्काबुक्की झाल्यानंतर म्हणाले...कॅलिफोर्नियातील कार्यक्रमात काँग्रेस नेते राहुल गांधी यांना खलिस्तानी समर्थकांच्या एका गटाने धक्काबुक्की केली, ज्यांनी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. कार्यक्रमादरम्यान त्यांच्या भाषणात काही काळ व्यत्यय आणला. राहुल गांधींनी घोषणाबाजीला उत्तर देताना स्मितहास्य केले आणि म्हणाले, ‘स्वागत आहे, स्वागत आहे... नफरत के बाजार में मोहब्बत की दुकान.’ त्यानंतर त्यांनी समर्थकांसह प्रेक्षकांमध्ये सामील होऊन ‘भारत जोडो’च्या घोषणांनी उत्तर दिले.

अध्यक्ष ठरवणार पंतप्रधानपदाचा उमेदवारविरोधी एकजुटीसाठी आम्ही काम करत आहोत; परंतु मला वाटते की, भाजपला पराभूत करण्यासाठी विरोधी एकजुटीपेक्षा आणखी काहीतरी जास्तीचे लागेल, त्यासाठी पर्यायी दृष्टिकोन हवा आहे. भारत जोडो यात्रा ही अशी दृष्टी निर्माण करण्याच्या दिशेने पहिले पाऊल होते. ‘भारत जोडो यात्रे’च्या कल्पनेशी कोणताही विरोधी पक्ष असहमत असणार नाही,’ असे ते म्हणाले. एका प्रश्नाला उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले की, काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरवतील. 

समस्या बदलणार नाहीत : काँग्रेसबेरोजगारी, वाढती महागाई आणि द्वेषाचा प्रसार हे लोकांना त्रास देणारे खरे मुद्दे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समस्यांपासून लोकांचे लक्ष विचलित करण्याचा आणि त्यांच्या समर्थकांनी कितीही ढोल वाजविण्याचा प्रयत्न केला तरी या समस्या कायम राहतील.जयराम रमेश, सरचिटणीस, काँग्रेस

राहुल ‘बनावट’ गांधी आहेतराहुल गांधी ‘बनावट गांधी’ आहेत. त्यांना काहीच माहीत नाही, परंतु ते प्रत्येक विषयाचे तज्ज्ञ बनले आहेत.प्रल्हाद जोशी, केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीAmericaअमेरिका