शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

..तर अमेरिकेची युद्धनौका एका हल्ल्यात नेस्तनाबूत करू

By admin | Updated: April 23, 2017 16:47 IST

अमेरिकेची युद्धनौका यूएसएस कार्ल विन्सनला एका हल्ल्यात नेस्तनाबूत करू, अशी धमकी उत्तर कोरियानं दिली आहे

ऑनलाइन लोकमतस्योल, दि. 23 - उत्तर कोरियाला अमेरिकेनं चहूबाजूंनी घेरलं असतानाही उत्तर कोरियाची युद्धाची खुमखुमी काही जाता जात नाही. अमेरिकेची युद्धनौका यूएसएस कार्ल विन्सनला एका हल्ल्यात नेस्तनाबूत करू, अशी धमकी उत्तर कोरियानं दिली आहे, असं वृत्त सत्ताधारी वर्कर पक्षाच्या मुखपत्रातून छापून आलं आहे. आमची सेना अमेरिकेची विमानवाहू युद्धनौका समुद्रात डुबवण्यास सज्ज आहे, असा इशारा उत्तर कोरियानं अमेरिकेला दिला आहे. त्यामुळे उत्तर कोरिया आणि अमेरिकेमध्ये युद्ध होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. उत्तर कोरियातील सत्ताधारी वर्कर पक्षाच्या मुखपत्रातून अमेरिकेवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. यात अमेरिकेच्या यूएसएस कार्ल विन्सन या युद्धनौकेची तुलना एका दृष्ट जनावराशी करण्यात आली आहे. आमची क्रांतिकारी सेना अणुऊर्जेवर चालणा-या अमेरिकेच्या युद्धनौकेला एका हल्ल्यात नेस्तनाबूत करण्यासाठी तयार आहे. जगाला आमच्या सेनेची ताकद दाखवण्यासाठी हीच चांगली संधी आहे, असंही या लेखात म्हटलं आहे. उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग ऊन हे गेल्या वर्षीच दोन अणुचाचण्या करून मोकळे झाले आहेत. किम जोंग ऊन यांच्या नेतृत्वात अमेरिकेपर्यंत मारा करू शकणा-या मिसाईल्सही विकसित केल्या जात आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाही उत्तर कोरियाशी संघर्ष करण्यात मोठ्या अडचणी येत आहेत. उत्तर कोरियाला कोणत्याही परिस्थितीत अणुचाचणी करायला देणार नाही, असंही अमेरिकेनं ठणकावलं आहे.अमेरिकेची युद्धनौका यूएसएस कार्ल विन्सन स्वतःच्या सैन्यासह प्रशांत महासागरात कोरियन द्विपकल्पातून उत्तर कोरियाच्या दिशेनं जलद रितीनं कूच करत आहे. ट्रम्प यांनी उत्तर कोरियाच्या अण्वस्त्र चाचणीच्या पार्श्वभूमीवर युद्धनौकेला उत्तर कोरियाच्या जवळ जाण्याचा आदेश दिला आहे. आमची युद्धनौका पुढच्या काही दिवसांत स्वतःच्या उद्देशापर्यंत पोहोचेल, असंही अमेरिकेचे उपराष्ट्रपती माईक पेन्स म्हणाले आहेत. अमेरिकेच्या कार्ल विन्सनच्या युद्ध सरावासाठी जपाननंही दोनही युद्धनौका पाठवल्या आहेत. उत्तर कोरियानं अमेरिकेसह दक्षिण कोरिया आणि जपानही युद्धाची धमकी दिली आहे. दुस-या महायुद्धानंतर जपानचं सैन्य अशा परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयार नाही. मात्र उत्तर कोरियाच्या अणुचाचण्यानंतर त्यांना प्रतिबंध करणा-या शस्त्रास्त्रांची मागणी जपाननं केली आहे. उत्तर कोरिया येत्या काही दिवसांत अणुचाचणी घेणार असल्याची दक्षिण कोरियाला शंका आहे. त्यामुळे दक्षिण कोरियानं स्वतःच्या सैन्यालाही सतर्कतेचा इशारा दिला आहे.