शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

फ्लूचा माग काढण्यास आता स्मार्ट फोनची मदत

By admin | Updated: August 19, 2015 23:05 IST

स्मार्ट फोन म्हणजे अद्ययावत माहिती आणि तंत्रज्ञान दुनियेतील परवलीचा शब्द. स्मार्ट फोन जनजीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. विविध

वॉशिंग्टन : स्मार्ट फोन म्हणजे अद्ययावत माहिती आणि तंत्रज्ञान दुनियेतील परवलीचा शब्द. स्मार्ट फोन जनजीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. विविध अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून हा स्मार्ट फोन आरोग्य आणि जीवनशैलीबाबतच्या उपयुक्त माहितीसह अनेक प्रकारे भरवशाचा मदतनीस ठरला असून सर्दी, शीतज्वराच्या (फ्लू-इन्फ्लूएंझा) साथीचे भाकीत करून आरोग्यरक्षक म्हणूनही तो सहायक होऊ शकतो. महाविद्यालय किंवा विद्यापीठ परिसरात राहणाऱ्या विद्यार्थ्यांचा या साथरोगांच्या संसर्गापासून बचाव करू शकेल, असे मोबाईल अ‍ॅप्लिकेशन युनिव्हर्सिटी आॅफ नॉर्थ कॅरोलिनातील अ‍ॅलीसन ऐलो आणि ड्यूक युनिव्हर्सिटीचे सांख्यिकी तज्ज्ञ कॅथरीन हेलर यांनी विकसित केले आहे.दाट वस्ती, व्यस्त जीवनशैलीमुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अशा विषाणूंची बाधा होते. अमेरिकेतील १८ दशलक्ष महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपैकी पाचपैकी एकाला फ्लूचा संसर्ग होऊ शकतो, असे संशोधकांचे म्हणणे आहे. या संशोधकांनी या मोबाईल अ‍ॅपचा चाचणी निष्कर्ष सिडनीत पार पडलेल्या २१ व्या आंतरराष्ट्रीय ज्ञान-शोध आणि आकडेवारी परिषदेत जाहीर केला आहे. (वृत्तसंस्था)