शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

६ जणांमुळे अमेरिकेच्या कन्सास राज्यात पेंच, मतदारही नसलेल्यांना व्हायचेय गव्हर्नर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 00:42 IST

अमेरिकेच्या कन्सास या राज्याच्या गव्हर्नरपदासाठी सहा अल्पवयीन मुले गांभीर्याने निवडणूक रिंगणात उतरल्याने मुरब्बी राजकारण्यांपुढे काहीसा पेंच निर्माण झाला आहे.

कन्सास सिटी : अमेरिकेच्या कन्सास या राज्याच्या गव्हर्नरपदासाठी सहा अल्पवयीन मुले गांभीर्याने निवडणूक रिंगणात उतरल्याने मुरब्बी राजकारण्यांपुढे काहीसा पेंच निर्माण झाला आहे. मजेची गोष्ट म्हणजे शाळा-कॉलेजांमध्ये शिकणारी ही किशोकवयीन मुले निवडणुकीत मतदारही नाहीत. कन्सास राज्यात गव्हर्नरपदाच्या निवडणुकीसाठी कोणतीही वयोमर्यादा नाही. कायद्यातील या उणीवेचा फायदा घेत या सहाजणांनी येत्या नोव्हेंबर महिन्यात होणाºया गव्हर्नरपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.या सहा अल्पवयीन उमेदवारांपैकी १६ वर्षांचा जोसेफ तुतेरा (ज्यू.) हा सर्वात तरुण आहे. त्याच्याखेरीज अ‍ॅरॉन कोलमन , टायलर रुझिच, डॉमिनिक स्कावुझो, इथान रँडलीज आणि जॅक बर्गेसनही पाच अल्पवयीन मुलेही निवडणूक रिंगणात उतरली आहेत.जॅक बर्गेसन हा अल्पवयीन मुलगा डेमोक्रॅटिक पक्षाचा उमेदवार असून त्याला किमान वेतन कायद्यात सुधारणा करण्याची इच्छा आहे. त्याशिवाय मारिजुआनाला कायदेशीर मान्यताही द्यायची आहे. डॉमिनिक स्कावुझो किमान वेतनात वाढ करण्याचे प्रयत्न करू इच्छितो. टायलर रुझिच हा शाळकरी विद्यार्थी असून तो रिपब्लिकन पक्षाचा उमेदवार आहे. जोसेफ तुतेरा ज्युनिअर हा रिपब्लिकन पक्षाचा उमेदवार असून त्याच्या मते युवकांकडे अनेक उत्तम कल्पना असतात. त्यांचे म्हणणे गांभीर्याने ऐकून घ्यायला हवे. कन्सासप्रमाणेच व्हरमॉन्ट व मॅसॅच्युसेटट्स या राज्यांमध्येही निवडणुकीला उभे राहाण्यासाठी उमेदवाराला कोणतीही वयोमर्यादा कायद्याने घालण्यात आलेलीनाही. (वृत्तसंस्था)कायदा दुरुस्तीचा विचार-1कन्सास राज्यातील लोकप्रतिनिधी चिंतेत पडले आहेत. निवडणुकीला उभे राहाण्यासाठी उमेदवाराचे नाव मतदारयादीत असणे आवश्यक असावे तसेच त्याने किमान चार वर्षे तरी कन्सास राज्यामध्ये वास्तव्य केलेले असावे, अशा दोन दुरुस्त्या विद्यमान निवडणुक कायद्यामध्ये करण्याचा विचार लोकप्रतिनिधींनी सुरु केला आहे.2मात्र हे दुरुस्ती विधेयक पुढील वर्षी जानेवारी महिन्यातच कन्सासच्या लोकप्रतिनिधीगृहात मांडता येऊ शकते. गव्हर्नरपदाची निवडणुक त्याआधीच होऊन जाईल. त्यामुळे विलक्षण पेचप्रसंग निर्माण होऊशकतो.

टॅग्स :United StatesअमेरिकाElectionनिवडणूक