शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

जेम्स बॉन्ड साकारणारे सर रॉजर मूर काळाच्या पडद्याआड !

By admin | Updated: May 23, 2017 20:36 IST

हॉलिवूड चित्रपटात जेम्स बॉन्डची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते सर रॉजर मूर यांचं निधन झाले. ते 89 वर्षांचे होते.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 23 - हॉलिवूड चित्रपटात जेम्स बॉन्डची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते सर रॉजर मूर यांचं निधन झाले. ते 89 वर्षांचे होते. 
 
सर रॉजर मूर यांचं कॅन्सरच्या दीर्घ आजाराने स्वित्झर्लंडमध्ये निधन झाल्याची बातमी त्यांच्या कुटुंबीयांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.
 
हॉलिवूडमध्ये त्यांची जेम्स बॉन्ड म्हणून ओळख होती. त्यांनी 1973 आणि 1985 मध्ये एमआय 6 एजेन्ट जेम्स बॉन्ड या सात चित्रपटांच्या सिरीजमध्ये जेम्स बॉन्डची भूमिका साकारली होती. या व्यतिरीक्त त्यांनी "दि सेंट" या टीव्ही सिरीयलमध्येही काम केले होते. यामधील सायमन टेंपलर ही त्यांची व्यक्तिरेखा आजही त्यांच्या चाहत्यांच्या आठवणीत आहे. याचबरोबर त्यांना सामजिक कार्याबद्दल आणि अभियन क्षेत्रातील योगदानाबद्दल अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. तसेच, त्यांना सामाजिक कार्यासाठी "नाईटहुड"ची उपाधी देण्यात आली होती.
  
14 ऑक्टोबर 1927 साली रॉजर मूर यांचा जन्म लंडनमध्ये झाला होता. हॉलिवूडमध्ये अभिनय करण्याआधी त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात 1950 साली मॉडेल म्हणून केली.