शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेत स्वातंत्र्य दिनाच्या परेडमध्ये गोळीबार; पाच मृत, १६ जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2022 23:32 IST

परेडच्या ठिकाणावरील एक उंच इमारतीवरून हा गोळीबार करण्यात आला. काही वृत्तांमध्ये जखमींची संख्या ५७ तर मृतांच्या आकड्यात वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

अमेरिकेमध्ये माथेफिरुंकडून गोळीबाराच्या घटना काही थांबण्याचे नाव घेत नाहीएत. शिकागोच्या हायलँड पार्कमध्ये स्वातंत्र्य दिनाच्या परेडमध्ये गोळीबाराची घटना घडली आहे. यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला असून १६ जण जखमी झाले आहेत. 

परेडच्या ठिकाणावरील एक उंच इमारतीवरून हा गोळीबार करण्यात आला. काही वृत्तांमध्ये जखमींची संख्या ५७ तर मृतांच्या आकड्यात वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. प्रशासनाने या घटनेची माहिती मिळताच, नागरिकांना घटनास्थळापासून दूर राहण्यास सांगितले आहे. पोलिस आणि वैद्यकीय पथकांना त्यांचे काम करू द्यावे असे आवाहन करण्यात आले आहे. डब्ल्यूजीएनच्या वृत्तानुसार फायरिंगमध्ये अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. या गोळीबारानंतर हल्लेखोर फरार झाला आहे. तो एका काळा रंगाच्या एसयुव्हीतून आला होता, असे पोलिसांचे म्हणणे आहे. 

रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार अमेरिकेचे प्रतिनीधी ब्रैड श्नाइडर हे या परेडच्या पुढील भागात होते. या घटनेत अनेकांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त करतो, असे ते म्हणाले. परेड सुरु झाल्यानंतर १० मिनिटांनी हा गोळीबार करण्यात आला. यानंतर परेड थांबविण्यात आली. गोळीबारामुळे लोकांमध्ये धावपळ उडाली. 

टॅग्स :AmericaअमेरिकाFiringगोळीबार