शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

'मला गोळ्या घाला आणि इथेच जमिनीत पुरा'; शेख हसीना लष्करी अधिकाऱ्याला असं का बोलल्या?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 14:39 IST

बांगलादेशात विद्यार्थ्यांचे आंदोलन हिंसक झाल्यानंतर पंतप्रधानपद सोडून शेख हसीना यांना देश सोडावा लागला. बांगलादेशातून फरार होण्यापूर्वी त्यांचं एका लष्करी अधिकाऱ्यासोबत बोलणं झालं होतं. गणभवनात त्यादिवशी काय घडलं होतं?

"मला गोळ्या घाला आणि इथेच गणभवनामध्ये दफन करा." हे विधान आहे शेख हसीना यांचे. ऑगस्ट २०२४ मध्ये शेख हसीना यांचं सरकार विद्यार्थी आंदोलकांनी उलथवून टाकले. त्यांना आपला देश सोडावा लागला. बांगलादेशातून फरार होण्यापूर्वी गणभवनात त्यांनी हे विधान केले होते. त्या असं का बोलल्या होत्या, याबद्दल आता आंतरराष्ट्रीय गुन्हे लवादासमोर सुनावणी सुरू असताना खुलासा झाला आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान आणि सध्या भारतात आश्रयाला असलेल्या शेख हसीना यांच्याविरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याविरोधातील गुन्हेगारी प्रकरणे आंतरराष्ट्रीय गुन्हे लवादासमोर आहे. या सुनावणीत मुख्य वकील मोहम्मद ताजूल इस्लाम यांनी ही माहिती माहिती. 

शेख हसीना ज्या दिवशी देशातून फरार झाल्या, त्यावेळी शेवटच्या तासाभरात काय घडले याबद्दल माहिती दिली. 

गणभवन हे बांगलादेशच्या पंतप्रधानांचे शासकीय निवासस्थान आहे. त्याच निवासस्थानात शेख हसीना लष्करी अधिकाऱ्याला मला गोळ्या घाला आणि इथेच गणभवनामध्ये पुरा असे म्हणाल्या होत्या. 

शेख हसीनांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा देण्यास दिला होता नकार

मोहम्मद ताजूल इस्लाम यांनी सांगितले की, 'बांगलादेशच्या संसदेचे अध्यक्ष शिरीन शर्मिन चौधरी हे सर्वात आधी शेख हसीना यांना पदावरून पायउतार व्हा, असे म्हणाले होते. त्यावेळी सत्ताधारी असलेल्या अवामी लीगच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला होता.'

पंतप्रधानांच्या निवासस्थानी मध्यरात्री झाली होती बैठक

'४ ऑगस्ट २०२४ रोजी मध्यरात्री पंतप्रधानांच्या निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीत शा‍ब्दिक चकमक उडाली. या बैठकीत मंत्रिमंडळातील वरिष्ठ मंत्री आणि सुरक्षा दलाचे प्रमुखही होते. सुरक्षा सल्लागार मेजर जनरल (निवृत्त) तारीक अहमद सिद्दिकी यांनी शेख हसीना यांनी राजीनामा द्यावा, असा सल्ला दिला. त्यावर शेख हसीना रागावला आणि राजीनामा देण्यास नकार दिला. त्यांनी लष्करप्रमुखांना आंदोलन चिरडून टाका असे निर्देश दिले', असे इस्लाम यांनी सांगितले. 

५ ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीत काय घडलं होतं?

'त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे ५ ऑगस्ट २०२४ रोजी शेख हसीना यांच्यासोबत लष्करी आणि पोलीस अधिकाऱ्यांची आणखी एक बैठक झाली. आंदोलन नियंत्रणाबाहेर गेलं असल्यासंदर्भात ही बैठक होती. पोलीस अधिकाऱ्यांनी आंदोलन नियंत्रणात आणण्यात असमर्थ असल्याचे सांगितले. त्यानंतर लष्करी अधिकाऱ्याने पुन्हा शेख हसीना यांना राजीनामा देण्याचा सल्ला दिला. त्यावर शेख हसीना रागाने लालबुंद झाल्या आणि 'मग मला गोळ्या घाला आणि इथेच गणभवनामध्ये मला दफन करा' असे म्हणाल्या', अशी माहिती इस्लाम यांनी दिली.

टॅग्स :Bangladeshबांगलादेशprime ministerपंतप्रधानPoliticsराजकारण