शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
2
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
3
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
4
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
5
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
6
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
7
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
8
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
9
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
10
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
11
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
12
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
13
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
14
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
15
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
16
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
17
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
18
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
19
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
20
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
Daily Top 2Weekly Top 5

अबब...डोनाल्ड ट्रम्प 827 दिवसांत तब्बल 10 हजारवेळा खोटे बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2019 15:27 IST

डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष पदाचा दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करताना खोटे बोलण्याचा 8 हजारांचा आकडा पार केला होता.

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प निवडणुकीआधीपासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. राष्ट्राध्यक्षपदावर आल्यापासून ते तब्बल 10 हजारवेळा खोटे बोलले आहेत. तर पहिला 5 हजारांचा टप्पा गाठताना त्यांना 601 दिवस लागल्याचा दावा अमेरिकी वृत्तपत्र वॉशिंग्टन पोस्टने केला आहे. याचाच अर्थ पहिल्या टप्प्यात ट्रम्प दिवसाला 8 वेळा खोटे बोलत होते. तर नंतरच्या दिवसात 23 वेळा खोटे बोलत होते. 

डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष पदाचा दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करताना खोटे बोलण्याचा 8 हजारांचा आकडा पार केला होता. वॉशिंग्टन पोस्टने 26 एप्रिलपर्यंतची आकडेवारी दिली आहे. तज्ज्ञांच्या मते नुकत्याच झालेल्या मध्यावधी निवडणुका ट्रम्प यांच्या खोटे बोलण्यामागचे मुख्य कारण आहे. याकाळात त्यांनी मेक्सिको बॉर्डरवरील भिंतीवरून अनेक भ्रम उत्पन्न करणारे दावे केले होते. 

प्रचारसभा आणि ट्विटरवर सर्वाधिकट्रम्प यांनी प्रचारसभांमध्ये 22 टक्के खोटे दावे केले आहेत. तसेच ते त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरूनही बऱ्याचदा खोटे बोलत असतात. 25 ते 27 एप्रिल या काळात त्यांनी 171 वेळा खोटे वक्तव्य केले आहे. यामध्ये जपान, चीन आणि युरोपियन संघटनेबरोबरच्या व्यापारी तोट्यावर खोटे बोलले होते. तसेच टॅक्स प्रणाली आणि ओबामा केअरवरूनही त्यांनी खोटे दावे केलेले आहेत. 

सहकारी देशांवरूनही खोटे बोलट्रम्प यांनी सहकारी देशांसोबतच्या संबंधांवरही खोटे बोलण्याचा विक्रम केला आहे. त्यांनी सांगितले की अमेरिकेने नाटोवर 100 टक्के खर्च केला. हे वक्तव्य चुकीचे होते. तसेच सौदी अरब आणि अमेरिकेमध्ये 450 अब्ज डॉलरचे व्यवहार झाल्याचा दावाही त्यांनी केला होता. जे संरक्षण तज्ज्ञांनी हाणून पाडले होते. 

वॉशिंग्टन पोस्टची करडी नजर वॉशिंग्टन पोस्टने सांगितले की, ते डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रत्येक वक्तव्यावर खरे- खोटे करण्यासाठी नजर ठेवून आहेत. वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांच्या 100 दिवसांच्या कव्हरेजमध्ये ऑनलाईन प्रोजेक्टअंतर्गत फॅक्ट चेक सुरु करण्यात आले. कारण ट्रम्प हे एवढे खोटे बोलत होते, की देशाला त्याबद्दल खरे0खोटे सांगण्याची गरज होती. पहिल्या 100 दिवसांतच ट्रम्प दिवसाला 5 वेळा खोटे बोलत होते. 

 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाFake Newsफेक न्यूज