शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

धक्कादायक! Amazon वर ॐ लिहिलेल्या पायपुसण्यांची विक्री; देवतांच्या चित्रांची अंतर्वस्त्रेही

By हेमंत बावकर | Updated: November 10, 2020 14:58 IST

BoycottAmazon: ट्विटरवर अ‍ॅमेझॉन बायकॉट करण्याचा ट्रेंड सुरु झाला आहे. #BoycottAmazon हा हॅशटॅगवापरून परदेशातील भारतीयांनी अॅमेझ़ॉनवर टीकेची झोड उठविली आहे.

सध्या सगळीकडे सणासुदीचा काळ सुरु आहे. अशातच संतापजनक बाब समोर आली आहे. ईकॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉन ॐ अक्षर लिहिलेल्या डोअर मॅट म्हणजेच पाय पुसण्या विकत आहे. एवढेच नाही तर हिंदू देवतांची चित्रे असलेली अंतर्वस्त्रेही विकली जात असल्याचे उघड झाले आहे. 

महत्वाचे म्हणजे ही विक्री भारतात करण्यात येत नसून परदेशांमध्ये या वस्तू विकल्या जात आहेत. यामुळे ट्विटरवर अ‍ॅमेझॉन बायकॉट करण्याचा ट्रेंड सुरु झाला आहे. #BoycottAmazon हा हॅशटॅगवापरून परदेशातील भारतीयांनी अ‍ॅमेझ़ॉनवर टीकेची झोड उठविली आहे.

अ‍ॅमेझॉनवर याआधीही हिंदू देवतांच्या चित्रांची वस्त्रे, बूट विकल्याचे प्रकार घडले होते. यावेळीही भारतीयांनी विरोध केला होता. अमेरिकेसह अनेक देशांमध्ये त्यांच्या त्यांच्या श्रद्धास्थानांचे फोटो छापलेल्या वस्तू विकल्या जातात. यामध्ये हाफ पॅन्टपासून ते अंडरगारमेंटपर्यंत या छायाचित्रांचा वापर केला जातो. परंतू हिंदू संस्कृतीमध्ये हे कृत्य चुकीचे आहे. यामुळे परदेशातील अनेकांनी अमेझॉनविरोधात मोहिम उघडली असून अ‍ॅप अनइन्स्टॉल करायला सांगितले आहे. तर अनेकांनी त्या वस्तूंची विक्री बंद करून तातडीन त्या वस्तू हटविण्यची मागणी केली आहे. 

 विशेष म्हणजे हा हॅशटॅग वापरुन ट्विट करणाऱ्यांमध्ये परदेशात असणाऱ्या भारतीयांचाही समावेश आहे. भारतामध्ये असे प्रोडक्ट विकले जात नसले तरी जगातील इतर देशांमध्ये असे प्रोडक्ट विकून हिंदू संस्कृतीचा अपमान केला जात असल्याचा आरोप अनेकांनी ट्विटवरुन केला आहे.

 

टॅग्स :amazonअ‍ॅमेझॉनHinduहिंदू