शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! 'पाकिस्तान हा इराणपेक्षाही मोठा धोका'; अमेरिकन गुप्तचर प्रमुखांचा इशारा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 07:51 IST

इराणपेक्षाही पाकिस्तान हा अमेरिकेसाठी अधिक घातक ठरू शकतो, असा इशारा गबार्ड यांनी दिला असून, यामुळे जागतिक राजकारणात खळबळ उडाली आहे.

जगातील महासत्ता असलेल्या अमेरिकेला येत्या काळात रशिया किंवा चीनच नाही, तर शेजारील पाकिस्तानकडूनही मोठा धोका निर्माण होऊ शकतो, असा खळबळजनक दावा अमेरिकेच्या नॅशनल इंटेलिजन्स डायरेक्टर तुलसी गबार्ड यांनी केला आहे. इराणपेक्षाही पाकिस्तान हा अमेरिकेसाठी अधिक घातक ठरू शकतो, असा इशारा गबार्ड यांनी दिला असून, यामुळे जागतिक राजकारणात खळबळ उडाली आहे.

२०३५ पर्यंत धोक्याची धार होणार तीव्र

बुधवारी पार पडलेल्या एका महत्त्वाच्या ब्रीफिंगमध्ये तुलसी गबार्ड यांनी अमेरिकेसमोर असलेल्या अणुशक्तीच्या आव्हानांचा पाढाच वाचला. गबार्ड यांच्या मते, रशिया, चीन, उत्तर कोरिया आणि पाकिस्तान हे देश वेगाने प्रगत क्षेपणास्त्र यंत्रणा विकसित करत आहेत. या यंत्रणा केवळ पारंपरिक शस्त्रास्त्रांसाठी नसून अण्वस्त्रे वाहून नेण्यासाठीही सक्षम आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, सध्या अमेरिकेच्या टप्प्यात असलेल्या शत्रू राष्ट्रांच्या क्षेपणास्त्रांची संख्या ३ हजार आहे, ती २०३५ पर्यंत तब्बल १६ हजारांच्या पार जाण्याची भीती गुप्तचर विभागाने व्यक्त केली आहे.

पाकिस्तानचा रशिया-चीनशी वाढता घरोबा

गबार्ड यांनी केवळ पाकिस्तानातील अण्वस्त्रांवरच बोट ठेवले नाही, तर पाकिस्तानचे रशिया आणि चीनसोबत वाढत जाणारे संबंध ही अमेरिकेसाठी चिंतेची बाब असल्याचे म्हटले आहे. उत्तर कोरिया, रशिया, चीन आणि पाकिस्तान यांच्यातील हे नवे 'स्ट्रॅटेजिक ट्युनिंग' वॉशिंग्टनच्या सुरक्षेला थेट आव्हान देणारे ठरू शकते. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनीही पाकिस्तान अण्वस्त्र चाचण्यांमध्ये सक्रिय असल्याचे संकेत दिले होते, त्याचाच पुनरुच्चार आता गबार्ड यांनी केला आहे.

इराणची ताकद ओसरली?

एकीकडे पाकिस्तानच्या वाढत्या धोक्यावर भाष्य करताना गबार्ड यांनी इराणबाबत मात्र काहीसा दिलासादायक अहवाल दिला आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये अमेरिकेने इराणच्या युरेनियम संवर्धन कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर खिळ घातली होती. त्यानंतर इराणने पुन्हा आपली अण्वस्त्र क्षमता वाढवल्याचे कोणतेही ठोस पुरावे अद्याप मिळालेले नाहीत. मात्र, इराणच्या क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमावर अमेरिकेची करडी नजर असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

भारतासाठी इशारा काय?

अमेरिकेने पाकिस्तानला रशिया आणि चीनसारख्या बलाढ्य शत्रूंच्या रांगेत उभे केल्यामुळे दक्षिण आशियातील समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. पाकिस्तानकडे असलेले अण्वस्त्र तंत्रज्ञान आणि त्यांचे चीनशी असलेले सख्य हे भारतासाठीही नेहमीच चिंतेचे विषय राहिले आहेत. आता थेट अमेरिकेच्या गुप्तचर प्रमुखांनीच यावर शिक्कामोर्तब केल्याने पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय स्तरावर दबाव वाढण्याची शक्यता आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Pakistan: Bigger threat than Iran, warns US intelligence chief.

Web Summary : US intelligence warns Pakistan poses a greater threat than Iran due to its growing nuclear arsenal and ties with Russia and China. This could challenge US security and shift South Asian dynamics, raising concerns for India.
टॅग्स :AmericaअमेरिकाPakistanपाकिस्तान