शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

"अजूनही जिवंत आहे, तर नक्कीच काहीतरी मोठं काम करायचंय...", शेख हसीना यांनी समर्थकांना केलं संबोधित

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 08:49 IST

बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या अशांतता आणि हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी फेसबुक लाईव्हद्वारे अवामी लीग पक्षाच्या समर्थकांना संबोधित केले आहे. 

बांगलादेशात अजूनही हिंसाचार सुरु आहे. बुधवारी मध्यरात्री बांगलादेशात मोठ्या प्रमाणात निदर्शने झाली. आंदोलकांनी बांगलादेशचे राष्ट्रपिता बंगबंधू शेख मुजीबुर रहमान यांच्या धनमोंडी-३२ येथील निवासस्थानाला आग लावली. तसेच, त्यांचे घर बुलडोझरने पाडण्यात आले. दरम्यान, बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या अशांतता आणि हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी फेसबुक लाईव्हद्वारे अवामी लीग पक्षाच्या समर्थकांना संबोधित केले आहे. 

शेख हसीना म्हणाल्या की,  बांगलादेशात माझ्याविरुद्ध सुरू झालेले आंदोलन प्रत्यक्षात मला मारण्यासाठी आहे. मोहम्मद युनूस यांनी मला आणि माझ्या बहिणीला मारण्याची योजना आखली होती. तसेच, जर या हल्ल्यांनंतरही अल्लाहने मला जिवंत ठेवले असेल तर मला काहीतरी महत्त्वाचे काम करायलाच हवे. जर असं नसतं तर मी इतक्या वेळा मृत्यूवर कशी मात केली असती? असा सवाल शेख हसीना यांनी केला.

शेख हसीना यांनी आपल्या भाषणात स्वत:च्या निवासस्थानावरील हल्ल्याबद्दल प्रश्न उपस्थित केले. त्या म्हणाल्या की, घर का पेटवण्यात आले? मी बांगलादेशातील लोकांकडून न्यायाची मागणी करते. मी माझ्या देशासाठी काहीच केले नाही का? मग इतका अपमान का? असे प्रश्न शेख हसीना यांनी केले. तसेच, झालेल्या हल्ल्याबद्दल दुःख व्यक्त करताना म्हणाल्या की, माझ्या आणि माझ्या बहिणीच्या ज्या काही आठवणी शिल्लक होत्या, त्या आता पुसल्या गेल्या आहेत. घरे जाळता येतात, पण इतिहास पुसता येत नाही.

बुलडोझरने बांगलादेशचा इतिहास पुसला जाणार नाहीमाजी पंतप्रधान शेख हसीना यांनी आपल्या भाषणात म्हटले की, लाखो शहीदांच्या प्राणांच्या किंमतीवर आपण मिळवलेले राष्ट्रध्वज, संविधान आणि स्वातंत्र्य बुलडोझरने उध्वस्त करण्याची आणि नष्ट करण्याची ताकद त्यांच्यात अजूनही नाही. ते घर पाडू शकतात, पण इतिहास नाही. त्यांनी हे देखील लक्षात ठेवले पाहिजे की इतिहास आपला बदला घेतो. बुलडोझरने इतिहास पुसता येत नाही.

टॅग्स :BangladeshबांगलादेशInternationalआंतरराष्ट्रीय