शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अनेकांशी बोलत होतो, काश्मीरमध्ये पर्यटकांना मारतील'; राज ठाकरेंचा पहलगाम हल्ल्यावर मोठं विधान
2
ऐकत नाही भाऊ! टी-२० क्रिकेटमध्ये विराटचा नवा पराक्रम, 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच
3
'जेव्हा मी फोटो पाहिला, मला पहिला प्रश्न पडला की, भाजप...', 'त्या' फोटोवर राज ठाकरे पहिल्यांदाच बोलले
4
राज्यात रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, मुंबईतील कुख्यात ठाकूर गँगचेही कनेक्शन
5
IPL 2025: चांगल्या सुरुवातीनंतरही आरसीबीच्या पदरात निराशा, हैदराबादचा ४२ धावांनी विजय!
6
सोलापुरात भयंकर घटना! पोटच्या ७ वर्षाच्या मुलीला संपवलं अन् घराशेजारीच पुरलं; पोलिसांनी मृतदेह काढला बाहेर
7
बाप-लेक ज्या गाडीतून झाले फरार, ती थार पोलिसांनी केली जप्त; आणखी दोन गाड्या कोणत्या? 
8
Matthew Forde: गोलंदाजाची आक्रमक फलंदाजी, अवघ्या १६ चेंडूत अर्धशतक झळकावलं, डिव्हिलियर्सच्या विक्रमाशी बरोबरी
9
'निश्चितच, ठाकरे-पवार ब्रॅण्ड संपवण्याचा प्रयत्न चाललाय', राज ठाकरेंचं मोठं विधान
10
गडचिरोली: बिबट्या शिकारीसाठी आला अन् एका घरात घुसला, त्यानंतर दहा तास...
11
आमदार प्रवीण दटकेंच्या नावाने पैसे उकळण्याचा प्रयत्न, प्रकरण काय?
12
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण नव्या वळणावर; पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांचीही चौकशी होणार?
13
भारताला दहशतवादाविरोधात स्वरक्षणाचा पूर्ण अधिकार; जर्मनीने केले 'ऑपरेशन सिंदूर'चे समर्थन
14
Abhishek Sharma: अभिषेक शर्मानं षटकार मारून मैदानातील गाडीची फोडली काच, पाहा व्हिडीओ
15
रूपाली चाकणकर, रोहिणी खडसेंकडून कस्पटे कुटुबीयांची भेट अन् दोघीत शाब्दिक चकमक
16
Vaishnavi Hagawane Case : कस्पटे कुटुंबियांच्या भेटीनंतर अजित पवार म्हणाले, 'त्यांनी अजून दोन नावे सांगितली'
17
पोलिस महानिरीक्षक सुपेकर यांच्यामुळेच हगवणे कुटुंबीयांची हिंमत वाढली; अंजली दमानिया यांचा दावा
18
शिंदेंच्या शिवसेनेत उफाळला वाद! बाजोरिया हटावचा नारा, शिवसैनिकांनी बॅनर जाळले
19
'भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे खूप नुकसान झाले', पाकिस्तानी नेत्या मरियम नवाजची कबुली
20
स्पाय कॅमेऱ्यातून बायकोचे प्रायव्हेट व्हिडिओ..! निलेश चव्हाणच्या काळ्या कारनाम्यांची A टू Z स्टोरी

शरीफ यांच्या पदरी निराशा

By admin | Updated: October 24, 2015 03:07 IST

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना अमेरिकेच्या दौऱ्यात भारताशी संबंधित दोन महत्त्वाच्या मुद्यांवर मोठी निराशा पदरी घ्यावी लागली असून काश्मीर प्रश्नावर मध्यस्थी

वॉशिंग्टन : पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना अमेरिकेच्या दौऱ्यात भारताशी संबंधित दोन महत्त्वाच्या मुद्यांवर मोठी निराशा पदरी घ्यावी लागली असून काश्मीर प्रश्नावर मध्यस्थी करण्यास अमेरिकेने स्पष्ट नकार दिला.काश्मीर प्रश्नावर अमेरिकेच्या धोरणात कोणताही बदल झालेला नाही. पाकिस्तानने ‘लष्कर ए तोयबा’ आणि त्याच्या पाठीराख्या गटांवर कारवाई करण्याच्या पाकिस्तानने दिलेल्या आश्वासनाला अमेरिकेने ‘नवे पाऊल’ म्हटले आहे.बराक ओबामा आणि नवाज शरीफ यांच्यात गुरुवारी चर्चा झाल्यानंतर अमेरिकन प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्याने पत्रकारांना सांगितले की, ‘‘दीर्घकाळपासून पाकिस्तान काश्मीर प्रश्नावर अमेरिकेने मध्यस्थी करावी, अशी मागणी करीत आहे. परंतु ओबामा म्हणाले की, भारत आणि पाकिस्तान दोघांनीही त्यासाठी तयारी दाखविली तरच ते त्यास तयार होतील.’’ ओबामा-शरीफ यांच्या चर्चेत नियंत्रण रेषेवरील निगराणीसाठी ज्या प्रकारच्या व्यवस्थेचा उल्लेख संयुक्त निवेदनात आहे त्याबद्दलही हा अधिकारी म्हणाला, की त्यासाठीदेखील ते दोन्ही देश तयार असले पाहिजेत. भारत आणि पाकिस्तानने आपापसांतील प्रश्न द्विपक्षीय चर्चेतून सोडविले पाहिजेत.ओबामा यांच्याशी चर्चा झाल्यानंतर शरीफ पत्रकारांशी बोलताना म्हणाले की,‘‘काश्मीर प्रश्नावर द्विपक्षीय चर्चा होत नसल्यामुळे अशा परिस्थितीत तिसऱ्या देशाने भूमिका बजावली पाहिजे. जर भारत यासाठी तयार नसेल तर त्यामुळे अडथळा निर्माण होईल.’’ पाकिस्तानविरोधात जे दहशतवादी गट होते त्यांच्यावर त्याने राष्ट्रीय कार्य योजनेअंतर्गत कारवाई केली. आता त्याने त्याच प्रकारे ‘लष्कर ए तोयबा’ आणि त्याच्या पाठीराख्या गटांवर कारवाई करण्यात येईल, असे सांगितले आहे. पाकिस्तानच्या या निर्णयाचे अमेरिकेने कौतुक केले आहे. अणुकरारावर चर्चा नाहीचओबामा आणि शरीफ यांच्या भेटीनंतर वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही पाकिस्तानशी १२३ करारांवर कोणतीही चर्चा केली नाही. आम्ही नागरी अणु निर्यात करण्यासाठी अणुपुरवठा समूहात पाकिस्तानसाठी सूट मागणार नाही. अमेरिका पाकिस्तानशी अण्वस्त्रे करार करणार असल्याच्या वृत्ताबद्दल विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. वृत्तात जे म्हटले ते अजिबात खरे नाही, असे हा अधिकारी नाव जाहीर न करण्याच्या अटीवर म्हणाला.अमेरिका आणि भारत यांच्यात झालेल्या १२३ कराराला भारत-अमेरिका अणुकरार म्हटले जाते व त्याची रूपरेषा २००५ मध्ये तयार केली गेली होती. ओबामा व शरीफ यांनी पाकमधील अण्वस्त्रांच्या सुरक्षेबद्दल चर्चा केली. हा अधिकारी म्हणाला की, आपल्या अण्वस्त्रांच्या साठ्याला संभाव्य धोका कोणता आहे याची चांगली जाणीव पाकिस्तानला आहे.निवेदनातील काश्मीर उल्लेखाकडे भारताचा कानाडोळानवी दिल्ली : अमेरिका व पाकिस्तान यांच्या संयुक्त निवेदनातील काश्मीरच्या उल्लेखास फारसे महत्त्व देणे भारताने शुक्रवारी टाळले. सोबतच अमेरिकेला दिलेली आश्वासने पाक पाळेल, अशी आशाही व्यक्त केली.अमेरिका दौऱ्यावर असलेले पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी लष्कर-ए-तोयबासह अन्य दहशतवादी संघटनांविरुद्ध ठोस कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि शरीफ यांच्या भेटीनंतर यासंदर्भातील एक संयुक्त निवेदनही जारी करण्यात आले होते. भारत-पाकने सर्व वादग्रस्त मुद्यांची सोडवणूक करण्यासाठी सातत्यपूर्ण आणि लवचिक धोरण ठेवून चर्चा करावी, अशी अपेक्षा या संयुक्त निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी भारताची भूमिका स्पष्ट केली.