शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

पीओकेमध्ये शरीफांचा पक्ष विजयी

By admin | Updated: July 23, 2016 05:32 IST

पाकव्याप्त काश्मीर विधानसभेच्या निवडणुकीत पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लिम लीग (पीएमएल-एन) या पक्षाने घवघवीत यश मिळविले.

इस्लामाबाद : पाकव्याप्त काश्मीर विधानसभेच्या निवडणुकीत पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लिम लीग (पीएमएल-एन) या पक्षाने घवघवीत यश मिळविले. ४१ पैकी ३० जागा जिंकून या पक्षाने दोन तृतीयांश बहुमत प्राप्त केले आहे. पाकव्याप्त काश्मीरच्या विधानसभेची बुधवारी निवडणूक घेण्यात आली. २६ राजकीय पक्षांचे ४२३ उमेदवार रिंगणात होते. या विधानसभेत सध्या पाकिस्तान पीपल्स पार्टीचे (पीपीपी) सरकार आहे. मतदारांनी पीपीपीला नाकारले असून, त्यांचे केवळ दोन उमेदवार विजयी झाले आहेत.इम्रान खान यांचा पक्ष पाकिस्तान तेहरिक- ए- इन्साफलाही दोन जागा मिळाल्या, तर मुस्लिम कॉन्फरन्सने तीन जागांवर बाजी मारली. पीएमएल-एन, पीपीपी आणि पीटीआय या मुख्य प्रवाहातील राजकीय पक्षांत अटीतटीची लढत होईल, असे मानले जात होते. तथापि, पीएमएल-एनने एकहाती निवडणूक जिंकून राजकीय विश्लेषकांना आश्चर्यचकित केले. (वृत्तसंस्था)>संपूर्ण प्रक्रिया पाकिस्तानातचपाकव्याप्त काश्मिरातील विधानसभेच्या निवडणुकीसाठी एकूण २६ लाख ७५ मतदारांनी मतदान केले. पाकव्याप्त काश्मिरात १९७५ मध्ये विधानसभेची स्थापना झाल्यानंतरची ही नववी विधानसभा असेल. विधानसभेचे क्षेत्र केवळ १४,२४५ चौरस किलोमीटर असले तरी निवडणूक प्रक्रिया या क्षेत्रापुरती मर्यादित नाही. ही प्रक्रिया संपूर्ण पाकिस्तानात होते. कारण, ४१ पैकी १२ सदस्यांची निवड देशाच्या विविध भागात राहणारे ४,३८,८८४ मतदार करतात. लष्कराच्या देखरेखीखाली निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली. काही मतदान केंद्रांवर पीएमएल-एन आणि पीटीआयच्या कार्यकर्त्यांत झटापट झाल्याची वृत्ते असून, यात पाच जण जखमी झाले आहेत.