शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

नेतान्याहू, थोडी लाज वाटू द्या! हमास हल्ल्यातील बळींच्या स्मरणार्थ कार्यक्रमात आंदोलकांच्या घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2024 06:05 IST

घोषणाबाजी करणारे लोक हमासच्या हल्ल्यात मारले गेलेल्यांचे नातेवाइक होते. 

तेल अवीव/तेहरान : दक्षिण इस्रायलवरील हमास हल्ल्यातील बळींच्या स्मरणार्थ आयोजित कार्यक्रमात रविवारी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचे भाषण सुरू असतानाच आंदोलकांनी व्यत्यय आणला. नेतान्याहू, थोडी लाज वाटू द्या, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. या घोषणांमुळे नेतन्याहू यांना भाषण लगेचच थांबवण्यास भाग पाडले गेले. घोषणाबाजी करणारे लोक हमासच्या हल्ल्यात मारले गेलेल्यांचे नातेवाइक होते. 

हमासचा हल्ला रोखता न आल्याबद्दल अनेक लोक नेतान्याहूंना दोष देतात. इस्रायल आणि इराणचे नेते माघार घेण्यास तयार नाहीत. एकीकडे, इराणला खूप माेठे नुकसान पाेहाेचविले असून, आमचे उद्दीष्ट साध्य झाले, असा दावा नेतान्याहू यांनी केला, तर दुसरीकडे इराणचे सर्वाेच्च नेते अयातुल्ला खामेनी यांनी इस्रायलच्या हल्ल्यांचे अतिरंजीत वर्णन करायला नकाे, असे सांगून इराणच्या तरुणांच्या इच्छाशक्तीला समजावून सांगावे लागेल, असा इशाराही दिला आहे.

खामेनी काय म्हणाले?इस्रायलने हल्ल्याचे अतिरंजीत किंवा कमी वर्णन करू नये. इराण आणि इराणच्या तरुणांची इच्छाशक्ती समजावून सांगावी लागेल. इस्रायल सरकारचे गैरसमज दूर करायला हवे. तसेच राष्ट्र हितांची पूर्तता करणारी कारवाई कशी करावी, हे सांगणे अधिकाऱ्यांच्या हाती आहे. युद्ध भडकण्याची भीती खामेनी यांनी हल्ल्यास प्रत्युत्तर देण्याबाबत काेणतेही स्पष्ट वक्तव्य केले नाही. याशिवाय इराणच्या अधिकाऱ्यांनीही प्रतिहल्ल्याचे संकेत देणे टाळले. गाझा आणि लेबनाॅनमध्ये युद्धविरात काेणत्याही प्रत्त्युत्तरापेक्षा महत्त्वाचा आहे. इस्रायल कधीतरी हल्ला करणार, हे सर्वांनाच माहिती हाेते. या हल्ल्यानंतर आखातात माेठे युद्ध भडकण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

हल्ल्यात महिला वैमानिकही- इराणवर शनिवारी पहाटे झालेल्या हल्ल्यांत इस्रायलच्या महिला लढाऊ वैमानिकांनीही सक्रिय सहभाग घेतला हाेता. - इस्रायलच्या लष्कराने यासंदर्भात काही व्हिडीओ आणि छायाचित्रे जारी केली आहेत. त्यात महिला वैमानिक लढाऊ विमानांमध्ये बसून माेहिमेवर जाताना दिसतात.- एफ-१५, एफ-१६ आणि एफ-३५ विमानांचा वापर करताना आपल्या तळापासून १,६०० किलाेमीटर अंतरावर जाऊन लक्ष्यांचा वेध या महिला वैमानिकांनी घेतला. 

गाझामध्ये २२ ठारइस्रायलने उत्तर गाझामध्ये भीषण हवाई हल्ले केले. त्यात २२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली. शनिवारी रात्री उशिरा हे हल्ले करण्यात आले.

टॅग्स :Benjamin netanyahuबेंजामिन नेतन्याहूIsraelइस्रायलIranइराणInternationalआंतरराष्ट्रीय