शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

दावोसमध्ये शहबाज शरीफ यांची मोठी चूक? ट्रम्प यांच्या 'त्या' करारावर स्वाक्षरी अन् पाकिस्तानात राडा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 08:30 IST

जागतिक आर्थिक परिषदेत पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी घेतलेला एक निर्णय त्यांच्या अंगलट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

स्वित्झर्लंडमधील दावोस येथे सुरू असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी घेतलेला एक निर्णय त्यांच्या अंगलट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'गाझा बोर्ड ऑफ पीस'या वादग्रस्त चार्टरवर शरीफ यांनी स्वाक्षरी केली आहे. या निर्णयामुळे पाकिस्तानात नवा राजकीय संघर्ष उभा राहिला असून, विरोधकांनी शरीफ यांच्यावर देशाचा सौदा केल्याचा गंभीर आरोप केला आहे.

नेमकं प्रकरण काय? 

डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा संघर्ष संपवण्यासाठी २० मुद्द्यांचा एक प्लॅन तयार केला आहे. या प्लॅनचाच एक भाग म्हणून 'बोर्ड ऑफ पीस'ची स्थापना करण्यात आली आहे. दावोसमध्ये अनेक जागतिक नेत्यांच्या उपस्थितीत शहबाज शरीफ यांनी या चार्टरवर स्वाक्षरी करून पाकिस्तानचा पाठिंबा जाहीर केला. वरकरणी हे शांततेचे पाऊल वाटत असले, तरी पाकिस्तानमधील कट्टरपंथी आणि विरोधी पक्षांच्या मते, हा करार पॅलेस्टिनी जनतेच्या हिताचा नसून अमेरिकेचा अजेंडा रेटणारा आहे.

इम्रान खान यांच्या पक्षाचा कडाडून विरोध 

जेलमध्ये असलेले माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या 'पीआरआय' पक्षाने या निर्णयावरून रान उठवले आहे. "हा निर्णय पूर्णपणे अनैतिक आणि अपारदर्शक आहे. इतक्या मोठ्या आंतरराष्ट्रीय करारावर सही करण्यापूर्वी संसदेला विश्वासात का घेतले नाही?" असा सवाल पीटीआयने उपस्थित केला आहे. ट्रम्प यांचा हा बोर्ड म्हणजे संयुक्त राष्ट्रांना पर्याय उभा करण्याचा प्रयत्न असून, पाकिस्तानने यात सहभागी होणे म्हणजे स्वतःची फजिती करून घेणे आहे, अशी टीका विरोधकांनी केली आहे.

गाझाच्या नावाखाली संयुक्त राष्ट्रांना डावलण्याचा प्रयत्न? 

अहवालानुसार, या 'बोर्ड ऑफ पीस'चा उद्देश केवळ गाझापुरता मर्यादित नसून, जगातील इतर संघर्षांमध्येही हस्तक्षेप करणे हा आहे. यात गुंतवणूक, पुनर्निर्माण आणि नवीन आंतरराष्ट्रीय यंत्रणा उभी करण्याचा उल्लेख आहे. मात्र, याला संयुक्त राष्ट्रांच्या अधिकारांना कमी करण्याचा ट्रम्प यांचा डाव मानले जात आहे. याच मुद्द्यावरून पाकिस्तानमधील राजकीय वातावरण तापले आहे.

'इम्रान खान यांच्याशी चर्चा केल्याशिवाय निर्णय नको'

मजलिस वहदत-ए-मुस्लिमीनचे प्रमुख अल्लामा राजा नासिर अब्बास यांनीही या पावलाला कडाडून विरोध केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, "हा निर्णय पॅलेस्टिनी जनतेच्या भावनांचा अपमान करणारा आहे." तर दुसरीकडे, पीटीआयने मागणी केली आहे की, जोपर्यंत संसदेत यावर सविस्तर चर्चा होत नाही आणि इम्रान खान यांच्यासारख्या नेत्यांचे मत घेतले जात नाही, तोपर्यंत या कराराची अंमलबजावणी होऊ नये.

ट्रम्प यांचा अल्टीमेटम आणि पाकिस्तानची कोंडी 

विशेष म्हणजे, दावोसच्या याच मंचावरून डोनाल्ड ट्रम्प यांनी हमाससारख्या संघटनांना कडक इशारा दिला आहे. "एकतर शस्त्रे टाका, नाहीतर संपायला तयार राहा," अशा शब्दांत ट्रम्प यांनी ठणकावले होते. अशा स्थितीत ट्रम्प यांच्याशी हातमिळवणी करणे शहबाज शरीफ यांना घरच्या मैदावर महागात पडताना दिसत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली प्रतिमा सुधारण्यासाठी गेलेल्या शहबाज शरीफ यांनी स्वतःसाठी नवीन संकट ओढवून घेतले आहे, अशी चर्चा आता पाकिस्तानात रंगली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Shehbaz Sharif's Davos blunder: Trump's deal sparks outrage in Pakistan.

Web Summary : Shehbaz Sharif signed Trump's 'Gaza Board of Peace' charter in Davos, triggering political turmoil in Pakistan. Opposition accuses him of selling out the country, questioning the deal's transparency and impact on Palestinian interests. Imran Khan's party demands parliamentary debate before implementation.
टॅग्स :Pakistanपाकिस्तानDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाUSअमेरिका