शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

शाहबाज शरीफ नवे पंतप्रधान?, पाकमध्ये आज होणार निर्णय; बिलावल भुत्तो यांना परराष्ट्र खाते मिळण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2022 06:17 IST

अविश्वास प्रस्तावादरम्यान सभागृह सोडून गेलेले इम्रान खान पंतप्रधानपदावरून पायउतार झाल्यानंतर पाकिस्तानच्या नव्या पंतप्रधानांची निवड सोमवारी ११ एप्रिलला होईल.

इस्लामाबाद :

अविश्वास प्रस्तावादरम्यान सभागृह सोडून गेलेले इम्रान खान पंतप्रधानपदावरून पायउतार झाल्यानंतर पाकिस्तानच्या नव्या पंतप्रधानांची निवड सोमवारी ११ एप्रिलला होईल. त्यासाठी पाकिस्तान मुस्लीम लीग-नवाज पक्षाचे शाहबाज शरीफ आणि खान यांच्या पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ पक्षाचे शाह महमूद कुरेशी यांनी अर्ज दाखल केले. सध्याची स्थिती पाहता शाहबाज यांचे पारडे जड दिसते आहे. 

पाकिस्तान पीपल्स पार्टीने शरीफ यांच्या पक्षाशी आघाडी केली आहे. पक्षाचे सहअध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनी विराेधकांच्या बैठकीत पंतप्रधानपदासाठी शरीफ यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. बिलावल भुत्तो परराष्ट्रमंत्री होऊ शकतात. चौकशी करणारे अधिकारी रजेवरशरीफ यांच्याविराेधात आर्थिक गैरव्यवहाराचे आराेप असून त्याची चाैकशी फेडरल तपास संस्था करीत आहे. पंतप्रधानपदाच्या शर्यतीत शरीफ यांचे नाव आघाडीवर येताच तपास करणारे माेहम्मद रिझवान तातडीने रजेवर गेले आहेत.

अविश्वास प्रस्तावाद्वारे सत्तेतून बाहेर पडणारे इम्रान खान हे पहिलेच - ३४२ सदस्यसंख्या असलेल्या कनिष्ठ सभागृहात बहुमतासाठी १७२ मतांची गरज होती.- मतदानावेळी अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने १७४ मते पडली. - अविश्वास प्रस्तावाद्वारे सत्तेतून बाहेर पडावे लागणारे इम्रान खान हे पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान ठरले आहेत. इम्रान खान यांनी अविश्वास प्रस्तावावरील मतदान टाळण्यासाठी अखेरच्या क्षणापर्यंत अनेक प्रयत्न केले; परंतु त्यात त्यांना अपयश आले.- १८ ऑगस्ट २०१८ मध्ये निवडणूक जिंकल्यानंतर इम्रान खान पंतप्रधानपदी आले. त्यांचे सरकार ३ वर्षे ७ महिने २३ चालले. अविश्वास प्रस्तावावर १२ तासहून अधिक वेळ चर्चा झाली.

नव्या सरकारकडे केवळ ५ महिनेपाकिस्तानच्या कनिष्ठ सभागृहात ३४२ एवढे संख्याबळ आहे. नव्या पंतप्रधानाला १७२ मते मिळविणे आवश्यक आहे. नव्या सरकारच्या हाती केवळ ५ महिनेच राहणार असून ऑगस्टमध्ये सार्वत्रिक निवडणूक हाेणार आहे.

खान यांच्या निकटवर्तीयांच्या घरावर छापेअविश्वास प्रस्ताव गमाविल्यानंतर इम्रान खान यांचे अतिशय जवळचे सहकारी डाॅ. अर्सलान खालीद यांच्या घरावर छापे मारण्यात आले, तसेच त्यांच्या कुटुंबीयांचे फाेन ताब्यात घेण्यात आले. इम्रान खान यांच्या प्रचार माेहिमेत खालीद यांची भूमिका खूप महत्त्वाची हाेती.

टॅग्स :Pakistanपाकिस्तान