शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

शास्त्रज्ञांनी शोधल्या बेडकाच्या सात नव्या प्रजाती

By admin | Updated: February 23, 2017 01:22 IST

भारतीय शास्त्रज्ञांनी पाच वर्षांच्या अथक शोधानंतर छोट्या बेडकाच्या सात नव्या प्रजातींचा शोध लावला आहे. हे बेडूक आकाराने एवढे छोटे आहेत

नवी दिल्ली : भारतीय शास्त्रज्ञांनी पाच वर्षांच्या अथक शोधानंतर छोट्या बेडकाच्या सात नव्या प्रजातींचा शोध लावला आहे. हे बेडूक आकाराने एवढे छोटे आहेत की, लहान मुलाच्या अंगठ्याच्या नखावरही मावू शकतात. गुप्त अधिवास आणि किड्यांसारखा आवाज यामुळे त्यांच्याकडे यापूर्वी दुर्लक्ष झाले होते, असे दिल्ली विद्यापीठातील दोन संशोधकांनी केलेल्या अभ्यासात म्हटले आहे. या अभ्यासाचे नेतृत्व करणारे प्रोफेसर एस. डी. बिजू यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, हे बेडूक छोट्या भौगोलिक प्रदेशातील असल्यामुळे संशोधनाचे निष्कर्ष अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. वाघ आणि हत्ती यासारख्या मोठ्या प्राण्यांसह या छोट्या उभयचर जीवांचे संरक्षणही गरजेचे आहे. पश्चिम घाटातील बेडकांपैकी एकतृतीयांश प्रजाती विलुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. नव्या सात प्रजातींपैकी पाच प्रजातींही धोक्यात असून त्यांचे तातडीने जतन करण्याची गरज आहे. या प्रजाती बेडकांच्या इतर प्रजातींहून भिन्न आहेत. इतर बेडूक केवळ रात्री सक्रिय असतात; परंतु या प्रजातींचे बेडूक दिवसा तद्वतच रात्रीही सक्रिय असतात. नव्या सात प्रजातींपैकी चार प्रजाती १२.२ ते १५.४ मिलिमीटर एवढ्या लांबीच्या आहेत, असे ते म्हणाले.या जंगलात मोठ्या संख्येने हे बेडूक आढळून येतात. आकाराने खूपच लहान असल्यामुळेच कदाचित कोणाचे आतापर्यंत त्यांच्याकडे लक्ष गेले नसावे. हे बेडूक मोठ्या संख्येने आहेत. तथापि, त्यांचे भवितव्य अंधकारमय आहे. हे बेडूक वेगवेगळ्या नाही तर एकाच भागात दिसून आले. अनेक बेडूक तर त्यांच्या अधिवासापासून दूर शेतात आणि बागांमध्ये आढळून आले. मानवी वावर असल्यामुळे या जागा त्यांच्यासाठी असुरक्षित ठरू शकतात. दिल्ली विद्यापीठाच्या सोनाली गर्ग यांनी सांगितले की, हे बेडूक जमिनीवर राहतात आणि रात्री रातकिडे, तसेच पतंगांसारखा आवाज काढतात. नव्या जीवांचा शोध घेणाऱ्या शास्त्रज्ञांच्या पथकात सोनाली यांचा समावेश आहे. निशाचर बेडकांचा गट निक्टिबाट्रेचस या नावाने ओळखला जातो. या गटात आधीच २८ मान्यताप्राप्त प्रजाती आहेत. त्यातील केवळ तीन प्रजातींचा आकार १८ मि.मी.हून कमी आहे. आता या गटातील ज्ञात प्रजातींची संख्या वाढून ३५ झाली आहे. पश्चिम घाटात आढळणारी ही प्रजाती ७-८ कोटी वर्षे जुनी आहे. भारताच्या पश्चिम किनारपट्टीच्या समांतर असलेल्या पर्वतराजीत शेकडोंच्या संख्येने दुर्मिळ प्रजातींच्या वनस्पती आणि जीवजंतू आहेत; परंतु त्यांचे अस्तित्व धोक्यात आहे. संशोधक दीर्घ काळापासून पश्चिम घाटाजवळील जंगलात संशोधन करीत होते. मागील पाच वर्षांच्या संशोधनानंतर त्यांना या जंगलात बेडकाच्या नव्या प्रजातींचा शोध लागला. जैव विविधतेच्या दृष्टिकोनातून हा परिसर अत्यंत संपन्न समजला जातो. जैव विविधतेबाबत बोलायचे झाल्यास पश्चिम घाटातील या जंगलाची तुलना अमेझॉनशी केली जाते. २००६ पासून आतापर्यंत येथे उभयचर प्राण्यांच्या १०० हून अधिक नव्या प्रजाती आढळून आल्या आहेत.