इस्लामाबाद : पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतामध्ये सोमवारी अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात निमलष्करी दलाचे सात सुरक्षा कर्मचारी मारले गेले. लोरालई जिल्ह्याच्या मख्तर भागातील एका सुरक्षा चौकीवर ३६ हून अधिक अतिरेक्यांनी हल्ला केला. त्यांच्याकडे अत्याधुनिक शस्त्रे होती. फ्रंटिअर कोरच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी प्रत्युत्तर दिल्यामुळे दहशतवाद्यांचीही मोठी हानी झाली; मात्र ते आपल्या जखमी सहकाऱ्यांना व मृतांना सोबत घेऊन पलायन करण्यात यशस्वी झाले. अतिरेकी त्यांच्या कमांडरला झालेल्या अटकेचा बदला घेऊ इच्छित होते. कोणत्याही संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतली नाही; मात्र या भागात बलूच गनीम सुरक्षा दलांवर असे हल्ले करतात. (वृत्तसंस्था)
पाकमध्ये अतिरेकी हल्ल्यात सात ठार
By admin | Updated: January 13, 2015 00:03 IST