कोलंबो : श्रीलंकेतील बेकायदा व्यापारात सहभाग आणि मुदतीनंतरही देशात राहिल्याच्या आरोपावरून ७ भारतीयांना श्रीलंकेत अटक करण्यात आली. हे सातही जण २३ ते ६५ वर्षांदरम्यानचे आहेत. व्हिसाची मुदत संपल्यानंतर ते श्रीलंकेत राहिले व त्यांनी स्थलांतर कायद्याचे उल्लंघन केले तसेच पूर्व प्रांतातील कलमुनाईत बेकायदा व्यापारात गुंतल्याचा या सात जणांवर आरोप आहे, असे पोलिसांनी सांगितल्याचे वृत्त ‘डेली मिरर’ने दिले आहे. (वृत्तसंस्था)
सात भारतीयांना श्रीलंकेत अटक
By admin | Updated: September 22, 2014 09:49 IST