शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

भारताच्या मित्राने चीन सीमेवर उभी केली F-35 लढाऊ विमाने; जिनपिंग यांचं टेन्शन वाढलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 19:15 IST

जपानचे हवाई संरक्षण सुधारण्याची गरज लक्षात घेऊन नवीन आलेल्या F-35A विमानांना कोमात्सु येथे तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला असं जपानचे संरक्षण मंत्री जनरल नाकातानी म्हणाले. 

टोकियो - जपानने चिनी धोका लक्षात घेता मुख्य बेट होन्शुमधील कोमात्सु एअरबेसवर नवीन F-35 लढाऊ विमाने तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. जपान एअर सेल्फ डिफेंस फोर्सने उत्तरेकडील सीमेवर सैन्याची ताकद मजबूत करण्यासाठी अमेरिकन स्टील्थ फायटर जेट्स तैनात करण्याचा निर्णय केला. जपानने कॉन्ट्रॅक्टवर F 35B व्हर्टिकल टेक ऑफ आणि लँडिंग लढाऊ विमानांचे न्युटाबारू एअरबेसवर प्रशिक्षणही सुरू करण्याची तयारी केली आहे. या विमानांची पहिली खेप लवकरच येणार आहे.

यूएस एफ-३५ जॉइंट प्रोग्राम ऑफिस (JPO) नुसार, जपानने नवीन टेक्नॉलॉजी रिफ्रेश-३ (TR-३) कॉन्फिगरेशनमधील पहिले तीन एफ-३५ए जेट्स मिळवल्यानंतर कोमात्सु येथे लढाऊ विमानांची तैनाती करण्यात आली आहे. हे तीन जेट्स १ एप्रिल रोजी कोमात्सु येथे दाखल झाले. या तीन जेट्सच्या भर पडल्याने, जपानकडे आता एकूण ४१ एफ-३५ए लढाऊ विमाने आहेत. याआधी JASDF चा F-35A ताफा उत्तर जपानमधील मिसावा एअरबेसपर्यंत मर्यादित होता. जपानच्या समुद्रात (पूर्व समुद्रात) जपानचे हवाई संरक्षण सुधारण्याची गरज लक्षात घेऊन नवीन आलेल्या F-35A विमानांना कोमात्सु येथे तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला असं जपानचे संरक्षण मंत्री जनरल नाकातानी म्हणाले. 

जपान-चीन पूर्व सागरात वाद काय?

जपान आणि चीन यांच्यात पूर्व सागरात सागरी सीमेचा वाद आहे. हा वाद समुद्रातील सेनकाकु बेटावरून आहे. त्याला दियाओयू असं चीनने नाव दिले आहे. हा वाद राजनैतिक, धोरणात्मक आणि नैसर्गिक संसाधनांच्या दृष्टिकोनातून अतिशय संवेदनशील आहे. या बेटावर लोकवस्ती नाही, परंतु त्याच्या सभोवतालचे पाणी नैसर्गिक वायू, तेलाचे साठे आणि माशांनी समृद्ध आहे. १८९५ मध्ये जपान-चीन युद्धानंतर जपानने सेनकाकु बेटावर कब्जा केला. त्यावेळी जपान आणि चीन यांच्यात शिमोनोसेकी नावाचा करार झाला होता. दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेने ओकिनावा बेटासह हे बेटही ताब्यात घेतले. परंतु १९७२ मध्ये अमेरिकेने बेटाचे नियंत्रण पुन्हा जपानला दिले. 

सेनकाकु बेटावर सध्या जपानचे नियंत्रण आहे. हा बेट कधीही चीनचा भाग नव्हता असं जपान म्हणते, तर जपानने १८९५ मध्ये बळजबरीने चीनचा हा बेट ताब्यात घेतला असा चीनचा दावा आहे. चीन सातत्याने त्यांची ताकद वाढवत असून दक्षिणी सागरापासून पूर्व सागरातील बेटांवरही घेराबंदी करण्याचा प्रयत्न करत आहे. चीनने या भागात कोस्ट गार्ड, लढाऊ विमाने तैनात करणे सुरू केले आहे. दुसरीकडे अमेरिका जपानसोबत असून ती या बेटाचे रक्षण करणार असं सांगत आहे. त्यामुळे जपानने F 35 लढाऊ विमाने या भागात तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. सातत्याने या भागात जपान-चीन यांच्यात संघर्षाची स्थिती असते. 

टॅग्स :chinaचीनJapanजपानAmericaअमेरिका