५५ टक्के नागरिकांचे इंग्लंडमध्येच राहण्यासाठी मतदान
ऑनलाइन लोकमत
एडिनबर्ग, दि. १९ - स्कॉटलंडला स्वतंत्र राष्ट्राचा दर्जा देण्यासाठी गुरूवारी घेण्यात आलेल्या सार्वमताचे निकाल जाहीर झाले असून ५५ टक्के नागरिकांनी इंग्लंडमध्येच राहण्यासाठी मतदान केल्याने 'स्कॉटलंड' स्वतंत्र होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
वर्षोनुवर्ष राजघराण्याच्या अधिपत्याखाली असलेल्या युनायटेड किंग्डममधून स्कॉटलंडला स्वतंत्र राष्ट्राचा दर्जा द्यावा की नाही यासाठी काल जनमत चाचणी घेण्यात आली होती. त्यासाठी तब्बल ४२ लाख नागरिकांनी मतदान केले होते. त्याची मतमोजणी शुक्रवारी पार पडली. स्कॉटलंडच्या ३२ विभागातील २९ ठिकाणांचे निकाल हाती आले असून ५५ टक्के लोकांनी वेगळं न होण्यासाठी तर ४५ टक्के नागरिकांनी स्कॉटलंड स्वतंत्र व्हावे यासाठी मतदान केले आहे. स्कॉटलंड स्वतंत्र व्हावे यासाठी ग्लासगोमध्ये सर्वाधिक मतदान करण्यात आले.
३०७ वर्षांपूर्वी म्हणजेच १७०७ साली युनायटेड किंगडमचा भाग बनला होता. मात्र गेल्या गेल्या दोन वर्षांपासून स्कॉटलंड स्वतंत्र व्हावे यासाठी मोहिम सुरू झाली होती. मात्र स्कॉटलंडच्या जनतेने या मोहिमेला विरोध करत एकत्र राहण्यासाठीच कौल दिला आहे. ' जनतेने विरोधात मत दिल्याने निराश झालो आहे' असे मत स्वातंत्र्यावादी नेते अॅलेक्स सलॅलमंड यांनी व्यक्त केले. तर ब्रिटिश पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी या निकालाचे स्वागत करत 'जनतेने ब्रिटनच्या बाजूने निर्णय दिला असून आता आमची जबाबदारी वाढली असल्याचे' म्हटले आहे.