शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

बापरे! एकाच वेळी व्यक्तीला झाला मंकीपॉक्स, कोरोना आणि HIVचा संसर्ग; शास्त्रज्ञही हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2022 17:15 IST

एकाच व्यक्तीमध्ये तीन व्हायरस हे एकाच वेळी आढळले आहेत. शास्त्रज्ञ देखील या घटनेनंतर हैराण झाले आहेत. 

वेगाने पसरणाऱ्या विविध व्हायरसमुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच आता एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इटलीतील एका व्यक्तीला एकाच वेळी मंकीपॉक्स, कोरोना व्हायरस आणि एचआयव्हीची लागण झाल्याचे आढळून आले आहे. असा दावा केला जात आहे की जगातील अशा प्रकारची ही पहिलीच घटना आहे, ज्यामध्ये एकाच व्यक्तीमध्ये तीन व्हायरस हे एकाच वेळी आढळले आहेत. शास्त्रज्ञ देखील या घटनेनंतर हैराण झाले आहेत. 

कॅटेनिया विद्यापीठाच्या संशोधकांनी केलेला हा अभ्यास जर्नल ऑफ इन्फेक्शनमध्ये प्रकाशित झाला आहे. त्यानुसार, 36 वर्षीय व्यक्ती काही दिवसांपूर्वी स्पेनमध्ये गेला होता. तेथे 16 ते 20 जूनपर्यंत मुक्काम केला. तो परत आला तेव्हा त्याला आरोग्याविषयक अनेक समस्या होत्या. प्रवासातून परतल्यानंतर नऊ दिवसांनी ताप, घसा दुखणे, डोकेदुखी अशी लक्षणे दिसून आली. कोरोना चाचणी केली असता चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. तीन दिवसांनंतर त्याच्या हातात पुरळ दिसू लागली आणि हळूहळू ती शरीरभर पसरली. त्यामुळे त्यांची प्रकृती अधिकच गंभीर झाली. 

डॉक्टरांनी त्यांना तात्काळ कॅटानिया शहरातील रुग्णालयात दाखल केले आणि आयसीयूमध्ये नेऊन उपचार सुरू करण्यात आले. येथील चाचण्यांमध्ये त्याला मंकीपॉक्स आणि एचआयव्हीची लागण झाल्याची पुष्टी झाली. काही दिवसांपूर्वी त्या व्यक्तीला एचआयव्हीची लागण झाल्याचेही कळले. मात्र 11 जुलैपर्यंत रुग्णाच्या शरीरावरील मंकीपॉक्सचे पुरळ गेले आणि त्याचा कोरोना रिपोर्टही निगेटिव्ह आला. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता, परंतु त्यांना काही दिवस वेगळे राहण्याचा सल्ला देण्यात आला होता.

शास्त्रज्ञांच्या मते, एचआयव्ही एड्समुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती नष्ट होते. त्यामुळे इतर आजार होण्याचा धोका अनेक पटींनी वाढतो. यामधेच जर कोरोना व्हायरस आणि मंकीपॉक्सचा संसर्ग झाला तर समस्या आणखी वाढतात. मंकीपॉक्सची लक्षणे बर्‍याच लोकांमध्ये दिसत नाहीत परंतु ती एचआयव्ही असलेल्या व्यक्तीला सहजपणे संक्रमित करू शकते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHIV-AIDSएड्स