शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनापेक्षा धोकादायक विषाणू येणार; इबोला शोधणाऱ्या संशोधकानं दिला धोक्याचा इशारा

By कुणाल गवाणकर | Updated: December 24, 2020 09:31 IST

कोरोनापेक्षा अधिक धोकादायक विषाणू आफ्रिकेच्या वर्षावनांमध्ये तयार होताहेत; डॉ. जीन यांनी सांगितला पुढचा धोका

नवी दिल्ली: जगातील कोरोना बाधितांचा आकडा ८ कोटींच्या जवळपास पोहोचला आहे. तर मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या १७ लाखांच्या पुढे गेली आहे. एका बाजूला काही देशांनी कोरोना संकट रोखण्यासाठी लसीकरण सुरू केलं असताना दुसरीकडे कोरोनाचे नवे आणि धोकादायक स्ट्रेन आढळून येत आहेत. कोरोनाचे नवे स्ट्रेन जास्त वेगानं पसरतात. त्यामुळे धोका वाढला असून संपूर्ण जग चिंतेत आहे.कोरोनाचा आणखी एक नवा स्ट्रेन सापडला; जाणून घ्या धोका किती वाढलाएका बाजूला कोरोनाचं संकट कायम असताना आता इबोलाच्या विषाणूचा शोध लावणाऱ्या संशोधकानं धोक्याचा इशारा दिला आहे. भविष्यात येणारे विषाणू कोविड-१९ पेक्षा जास्त धोकादायक असतील, असं भाकीत प्राध्यापक डॉ. जीन-जॅक्स मुएम्बे ताम्फुम यांनी वर्तवलं आहे. डॉ. जीन यांनी १९७६ मध्ये इबोलाचा विषाणू शोधण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे त्यांनी वर्तवलेला अंदाज महत्त्वाचा आहे.ब्रिटनसह अनेक भागात कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा हाहाकार; पुन्हा सक्तीच्या लॉकडाऊनमध्ये राहावं लागणार?भविष्यात असंख्य प्रमाणात विषाणू येतील. यातले काही सध्याच्या कोविड-१९ पेक्षा जास्त धोकादायक असतील, असा दावा डॉ. जीन यांनी केला. या विषाणूंच्या निर्मितीची प्रक्रिया आफ्रिकेतल्या उष्णकटिबंधीय वर्षावनांमध्ये सुरू झाली आहे. आपण आता अशा जगात राहत आहोत, जिथे नवे नवे रोगकारक समोर येतील. मानवासाठी अतिशय धोकादायक असलेले विषाणू मोठ्या प्रमाणात आफ्रिकेच्या वर्षावनांमध्ये तयार होत आहेत. त्यांची संख्या अगणित आहे, असं जीन यांनी सांगितलं.कोरोना संकटातच आता मानवी मेंदू खाणाऱ्या जीवाणूचा कहर; CDC चा सतर्कतेचा इशाराइबोलाचा शोध घेण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या डॉ. जीन यांनी बाधितांच्या रक्ताचे नमुने गोळा केले होते. त्यासाठी ते आघाडीवर राहून काम करत होते. इबोला धोकादायक रोग असून तो रक्तस्रावास कारणीभूत ठरतो. या रोगाचा प्रसार सुरू होताच सुरुवातीला तब्बल ८८ टक्के रुग्णांचा मृत्यू झाला होता. याशिवाय ज्या रुग्णालयांमध्ये या रुग्णांवर उपचार सुरू होते, तिथले ८० टक्के कर्मचारी मृत्यूमुखी पडले होते. यम्बुकु मिशन रुग्णालयात इबोलाचा शोध लागला होता.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याEbolaइबोला