शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

Science: शास्त्रज्ञांनी बनविले ऑक्सिजन देणारे ‘झाड’

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2023 09:37 IST

Science: हवेत सातत्याने वाढत असलेल्या कार्बन डायऑक्साइड जगासमोर प्रदूषणाचे मोठे संकट उभे राहिले आहे. शिवाय हा वायू तापमान वाढीस कारणीभूत ठरत आहे.

हवेत सातत्याने वाढत असलेल्या कार्बन डायऑक्साइड जगासमोर प्रदूषणाचे मोठे संकट उभे राहिले आहे. शिवाय हा वायू तापमान वाढीस कारणीभूत ठरत आहे. याचे प्रमाण कमी करायचे असेल तर झाडे लावणे हा एकमेव उपाय आहे. परंतु प्रदूषणाच्या संकटात सापडलेल्या, लोकसंख्येची घनता अधिक असलेल्या आणि वृक्षारोपणासाठी पुरेशी जागा उपलब्ध नसलेल्या देशांनी काय करावे? यांच्यासाठी ‘लिक्विड ३’ हे ‘झाड’ रामबाण उपाय ठरेल. सर्बियातील शास्त्रज्ञांच्या गटाने हे कृत्रिम झाड तयार केले आहे. 

काय आहे ‘लिक्विड ३’? n हे झाड म्हणजे मोठी काचेची टाकी असते. यात सहाशे लिटर पाणी असते. पाण्यात विशिष्ट प्रकारचे एकपेशीय सूक्ष्म शेवाळ वाढविले जाते. n हे शेवाळ प्रकाश संश्लेषणासाठी कार्बन डायऑक्साइड शोषून घेते व बदल्यात शुद्ध ऑक्सिजन देते.n याची क्षमता १० वर्षांच्या पूर्ण वाढलेल्या दोन झाडे किंवा २०० चौरस मीटर क्षेत्रावरील गवताइतकी असते. तांत्रिक भाषेत याला फोटो-बायो रिॲक्टर असे म्हणतात. 

सर्बियाला का गरज भासली?दोन मोठ्या कोळसा ऊर्जा प्रकल्पांमुळे बेलग्रेड हे सर्बियातील सर्वात प्रदूषित झाले होते. २०१९ मध्ये युरोपातील पाचवे सर्वाधिक प्रदूषित शहर म्हणून सर्बियाची नोंद झाली होती.२०२० साली सर्वात खराब हवेच्या बाबतीत सर्बिया जगात २८ व्या स्थानी होते. तिथे हरित क्षेत्रे तयार करणे, झाडे लावणे कठीण आहे, कारण यासाठी मोकळ्या जागांचा अभाव आहे. 

सर्वात प्रथम कुठे बसविले?  पहिल्यांदा हे झाड सर्बियाच्या बेलग्रेड या शहरात सप्टेंबर २०२१ मध्ये बसविले. यात एक बाक बसविला असून तिथे स्मार्टफोन चार्ज करता येतो. याला एक सोलार ऊर्जेचे पॅनेलही बसविले आहे. प्रदूषणाची समस्या असणाऱ्या शहरांसाठी हे झाड मौल्यवान ठरणार आहे. संयुक्त राष्ट्राकडूनही सन्मान  ग्लोबल एन्व्हायर्नमेंट फॅसिलिटी ही संस्था व संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (यूएनडीपी) यांच्याद्वारे राबविण्यात आलेल्या पर्यावरणस्नेही शहरी विकास प्रकल्पाकडून लिक्विड ३ चा सर्वात उत्तम ११ नावीन्यपूर्ण व पर्यावरणस्नेही उपक्रमांमध्ये समावेश केला आहे.

टॅग्स :scienceविज्ञानtechnologyतंत्रज्ञान