शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आता सौदी अरेबियातील महिला चालविणार गाड्या, महिलांना वाहन चालविण्यास परवानगी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 07:21 IST

सौदीचे किंग सलमान यांनी फर्मान काढले असून त्यांनी महिलांना वाहन चालविण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे हा निर्णय महिलांसाठी महत्वपूर्ण आणि ऐतिहासिक ठरणार आहे.

ठळक मुद्देसौदीत महिलांना वाहन चालविण्यास परवानगी किंग सलमान यांनी काढले फर्मानमहिलांसाठी महत्वपूर्ण निर्णय

रियाध - सौदी अरेबियातील महिलांना वाहन चालविण्यास परवानगी देण्यात आल्याचे वृत्त येथील मीडियाने दिले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सौदीचे किंग सलमान यांनी फर्मान काढले असून त्यांनी महिलांना वाहन चालविण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे हा निर्णय महिलांसाठी महत्वपूर्ण आणि ऐतिहासिक ठरणार आहे. आतापर्यंत सौदीत महिलांसाठी आणि पुरुषांसाठी वेग-वेगळे कायदे आहेत. यामध्ये महिलांना वाहन चालवण्‍याची परवानगी नव्हती. मात्र, आता परवानगी देण्यात आली आहे. किंग सलमान यांनी दिलेल्या आदेशानुसार, यासंदर्भात एक समिती स्थापन करण्यास सांगितली आहे. तसेच, ही समिती तीस दिवसांच्या आत सूचना सादर करेल. त्यानंतर जून 2018 मध्ये शरिया कायद्यानुसार महिलांना वाहन चालविण्यास परवानगी देण्याच्या आदेशाला मंजूरी देण्यात येईल. 

सौदीच्या परराष्ट्र मंत्रालयाने यासंदर्भात ट्विटरवर घोषणा केली आहे. यामध्ये सौदीतील महिलांना वाहन चालविण्यास परवानगी देण्यात आली आहे. महिलांना गाडी चालविण्यासाठी घातलेले निर्बंध म्हणजे एक सामजिक मुद्दा असल्याचे म्हटले जात आहे. कारण, धर्मात आणि कायद्यांमध्ये अशाप्रकारच्या निर्बंधांचा उल्लेख नाही. गेल्या कित्येक वर्षांपासून या मुद्यावर सरकार, मीडिया आणि समाजामध्ये चर्चा सुरु आहे. तसेच, महिलांना गाडी चालविण्यास बंदी घातल्यामुळे जगभरातून सौदी सरकारला टीकेला सामोरे जावे लागल्याचेही म्हटले आहे. दरम्यान, किंग सलमान यांच्या या निर्णयाचे अमेरिकेने स्वागत केले आहे. सौदीतील महिलांना गाडी चालविण्यास परवानगी दिल्याच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. हा निर्णय देशाला योग्य दिशेला घेऊन जाणारा आहे, असे अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या एका प्रवक्त्याने म्हटले आहे. 

 

टॅग्स :carकार