शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

सॅमसंगला पेटंट चौर्य भोवले

By admin | Updated: May 5, 2014 15:10 IST

अमेरिकेच्या एका न्यायालयाने अमेरिकी कंपनी अँपलच्या दोन पेटंट नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कोरियन कंपनी सॅमसंगला १२ कोटी डॉलरची भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.

 न्यायालयाचा आदेश : अँपलला मिळणार १२ कोटी डॉलरची नुकसान भरपाईकॅलिफोर्निया : अमेरिकेच्या एका न्यायालयाने अमेरिकी कंपनी अँपलच्या दोन पेटंट नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कोरियन कंपनी सॅमसंगला १२ कोटी डॉलरची भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, अँपलने दावा केलेल्या नुकसान भरपाईहून ही रक्कम खूप कमी तर आहेच शिवाय न्यायालयाने सॅमसंगच्या पेटंटचे उल्लंघन केल्याबद्दल अँपललाही दीड लाख डॉलरच्या भरपाईचे आदेश दिले आहेत. कॅलिफोर्नियाच्या एका ज्युरीने शुक्रवारी सॅन जोसे येथील संघीय न्यायालयात दोन्ही कंपन्यांच्या ताज्या वादावर निर्णय सुनावला. कित्येक महिन्यांपासून या प्रकरणाची सुनावणी सुरु होती. स्मार्टफोन फिचरचे पेटंट चोरल्याचा आरोप अँपलने सॅमसंगवर केला होता. तर सॅमसंगने आरोप फेटाळून लावत अँपलने आपल्या पेटंट नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला होता. ताज्या खटल्यात अँपलने पाच पेटंटचे उल्लंघन केल्याप्रकरणी सॅमसंगकडून २.२ अब्ज डॉलरची मागणी केली होती. या पेटंटमध्ये ‘स्लाईड टू अनलॉक’ या फंक्शनचाही समावेश आहे. मागील काही वर्षांपासून अँपल व सॅमसंगदरम्यान अनेक देशांमध्ये पेटंट कायद्याबाबत लढाई सुरू आहे. दोन वर्षांपूर्वी एका ज्युरीने सॅमसंगला अँपलचे तंत्रज्ञान वापरल्यामुळे ९३ कोटी डॉलर भरणा करण्याचे आदेश दिले होते. हा निर्णय जागतिक पातळीवर प्रमुख दोन स्मार्टफोन उत्पादक कंपन्यांतील बौद्धिक संपदा कायद्यासंबंधीच्या लढय़ाशी संबंधित आहे. (वृत्तसंस्था)