शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

कामगारांना कॅन्सर झाल्याबद्दल सॅमसंगने अखेर मागितली माफी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2018 02:13 IST

आपल्या काही कारखान्यांत काम केल्यामुळे काही कामगारांना कॅन्सर झाल्याबद्दल सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सने अखेर माफी मागून भरपाई देण्याचे मान्य केल्याने दशकभराच्या वादावर पडदा पडला.

सेऊल : आपल्या काही कारखान्यांत काम केल्यामुळे काही कामगारांना कॅन्सर झाल्याबद्दल सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सने अखेर माफी मागून भरपाई देण्याचे मान्य केल्याने दशकभराच्या वादावर पडदा पडला.मृत्युमुखी पडलेल्या एका २२ वर्षीय तरुण कामगाराचा पिता व सॅमसंगचे सह-अध्यक्ष कीम की-नाम यांनी एका औपचारिक तडजोड करारावर स्वाक्षऱ्या केल्या. इतर पीडितांनाही करारानुसार लाभ देण्याचे कंपनीने मान्य केले. तडजोडीनुसार, सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स प्रत्येक पीडित कामगार वा त्याच्या कुटुंबास १ लाख ३३,000 डॉलरची भरपाई देईल. ही भरपाई १९८४ पर्यंतच्या जुन्या कामगारांना मिळेल. एकूण १६ प्रकारचे कॅन्सर, गर्भपात, कामगारांच्या मुलांना जडलेले विविध प्रकारचे जन्मजात आजार यांसाठी ही भरपाई दिली जाईल.याबाबत कीम की-नाम म्हणाले की, आजारी पडलेले कामगार व त्यांच्या कुटुंबीयांची आम्ही माफी मागतो. सेमीकंडक्टर निर्मितीच्या कारखान्यांत आरोग्यविषक जोखमीचे योग्य व्यवस्थापन करण्यात आम्ही अपयशी ठरलो. सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले कारखान्यांत काम करणाºया २४0 कामगारांना आजारपण जडले होते. त्यातील ८0 जण दगावले. त्यात तरुण महिलांचा मोठ्या प्रमाणात समावेश होता. (वृत्तसंस्था)२००७ साली उघडकीसहे प्रकरण २00७ मध्ये उघडकीस आले होते. सुवोन येथील सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले कारखान्याच्या अनेक माजी कामगारांनी तसेच त्यांच्या कुटुंबीयांनी आजारपणाची माहिती उघड केली होती. याप्रकरणी सुमारे १0 वर्षे कोर्टकचेºया चालल्या. न्यायालयांसह सेऊलची कामगार कल्याण संस्था तसेच एका मध्यस्थ संस्थेने याप्रकरणी अनेक निवाडे दिले. अखेर कंपनीने आपली चूक मान्य करून कामगारांशी तडजोड केली आहे.

टॅग्स :samsungसॅमसंग