शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

Samoa PM Oath Ceremony : पराभूत पंतप्रधान सत्ता सोडेनात, संसदेलाच ठोकलं टाळं; पहिल्या महिला पंतप्रधानांनी तंबूतच घेतली पदाची शपथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2021 13:21 IST

Samoa PM Oath Ceremony : First Woman PM Elect Dismisses Rivals Electoral Games Amid Vote Crisis जगातील सर्वात लहान देशांपैकी एक असलेला समोआ हा देश सध्या राजकीय घडामोंडींमुळे आहे चर्चेत.

ठळक मुद्देजगातील सर्वात लहान देशांपैकी एक असलेला समोआ हा देश सध्या राजकीय घडामोंडींमुळे आहे चर्चेमाजी पंतप्रधानांचा निवडणुकीतील पराभवानंतरही सत्ता सोडण्यास नकार.

जगातील सर्वात लहान देशांपैकी एक असलेल्या सिमोआ हा देश सध्या देशात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींमुळे चर्चेचा विषय ठरला आहे. नुकत्याच या ठिकाणी निवडणुका पार पडल्या आणि निवडणुकांचे निकालही जाहीर झाले. या निवडणुकांमध्ये देशाला पहिल्या महिलापंतप्रधान मिळाल्या. परंतु आपली सत्ता गेल्यानं नाराज असलेले माजी पंतप्रधान ट्विलाएपा सैलेले मैलिलेगाओई (Tuilaepa Sailele Malielegaoi) यांनी आपलं पद सोडण्यास नकार दिला आहे. तसंच देशातील राजकीय परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की पंतप्रधानपदी निवड झालेल्या गईं नाओमी मताफा (Naomi Mataafa) यांना संसदेच्या बाहेरच तंबूमध्ये शपथविधी सोहळा उरकावा लागला. दरम्यान, विरोध करण्यासाठी माजी पंतप्रधानांच्या पक्षानं थेट संसदेलाच टाळं ठोकलं. त्यानंतर आता देशासमोर नेतृत्वाचं संकट उभं ठाकलं आहे. Samoa PM Oath Ceremony : First Woman PM Elect Dismisses Rivals Electoral Games Amid Vote Crisis.

समोआमध्ये सत्तेत असलेल्या ह्युमन राईट्स प्रोटेक्शन पार्टीचा (HRPP) मताफा यांच्या FAST पार्टीनं पराभव केला होता. एप्रिल महिन्यात या ठिकाणी निवडणुका पार पडल्या. दरम्यान विजयानंतर सोमवारी जेव्हा पंतप्रधानपदाची शपथ घेण्यासाठी त्या जेव्हा पोहोचल्या तेव्हा त्यांना संसेदत जाऊ देण्यात आलं नाही. याशिवाय पराभूत झालेल्या पक्षानं विरोध करण्यासाठी थेट संसदेलाच टाळं ठोकलं. त्यानंतर संसेदच्या बाहेर तंबूमध्ये मताफा आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांचा शपथविधी पार पडला. तर दुसरीकडे मैलिलेगाओई हा शपथविधी सोहळा मानण्यास तयार नाहीत. चुरशीची लढतHRPP आणि FAST या दोन्ही पक्षांमध्ये चुरशीची लढत झाली होती. यादरम्यान दोन्ही पक्षांना २५-२५ जागांवर विजय मिळाला होता. परंतु एका अपक्ष उमेदवारानं FAST पार्टीला पाठिंबा दिला. त्यानंतर HRPP नं न्यायालयाचीही मदत घेतली. तसंच महिला खासदार कोट्याचं पालन करण्यात आलं नसल्याचा दावाही केला. परंतु त्यानंतर देशात निवडणूक आयोगानं एप्रिल महिन्याच्या मतदानाच्या निकालांना रद्द केलं आणि २१ मे रोजी नव्या निवडणुकांची घोषणा केली. परंतु त्यानंतर न्यायालयानं एप्रिल महिन्यात घेण्यात आलेल्या निवडणुका योग्य असल्याचं म्हटलं. मैलिलेगाओई हे तब्बल २२ वर्षे सत्तेत होते. सामोआ हा देश १९६२ मध्ये न्यूझीलंडपासून स्वतंत्र झाला होता. 

टॅग्स :prime ministerपंतप्रधानNew Zealandन्यूझीलंडWomenमहिलाParliamentसंसद