लाहोर : मुंबईवरील २६/११ च्या हल्ल्यावर आधारित असणाऱ्या ‘फँटम’ या बॉलीवूड चित्रपटावर बंदी घालावी अशी मागणी पाकिस्तानातील जमात उद दवा व लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनांचा प्रमुख हफीज सईद याने केली आहे. त्यासाठी लाहोर उच्च न्यायालयात त्याने याचिका दाखल केली आहे. हफीज हा २६/११ च्या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार असल्याचा भारताचा आरोप आहे. दरम्यान, फँटम हा चित्रपट अजूनही प्रदर्शित झाला नाही. २८ आॅगस्ट रोजी प्रदर्शित होणार असलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर सध्या प्रदर्शित झाला आहे. त्यावरच हफीज सईद न्यायालयात गेला आहे. फँटममध्ये पाकिस्तानविरोधी कंटेंट आहे, हा चित्रपट पाकिस्तानविरोधी प्रपोगंडा आहे, असे हफीजने दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे.
चित्रपटावर बंदीसाठी सईदची कोर्टात धाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2015 22:15 IST