थिंपू : दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार्य संघटनेच्या (सार्क) सदस्य देशांच्या दौऱ्यांतर्गत भारताचे परराष्ट्र सचिव एस. जयशंकर हे रविवारी सर्वप्रथम भूतानला पोहोचले. प्रमुख भूतानी नेत्यांसोबत प्रादेशिक सहकार्य व द्विपक्षीय संबंधांसोबतच सार्क देशांशी भारताचे संबंध मजबूत करण्याबाबत आज त्यांनी चर्चा केली.भूतानला पोहोचल्यानंतर काही तासांतच जयशंकर यांनी पंतप्रधान शेरिंग तोबगे यांच्याशी बातचीत केली. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता सय्यद अकबरुद्दीन यांनी टिष्ट्वट केले की, ‘जयशंकर यांच्या सार्क दौऱ्यास प्रारंभ झाला आहे. परराष्ट्र सचिव आज थिंपूत आहेत. आज त्यांनी बांगलादेश, भूतान, भारत व नेपाळ यांच्यातील सहकार्र्य वाढीवर चर्चा केली.’ भूताननंतर ते सोमवारी बांगलादेश, मंगळवारी पाकिस्तान आणि ४ मार्च रोजी अफगाणिस्तानला जाणार आहेत. (वृत्तसंस्था)
सार्क दौरा; परराष्ट्र सचिव भूतानमध्ये
By admin | Updated: March 1, 2015 23:32 IST