शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आपसातले मतभेद वादाचं कारण नको, चिनी परराष्ट्र मंत्र्यांची जयशंकर यांनी घेतली भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2019 17:10 IST

भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर सध्या तीन दिवसांच्या चीनच्या दौऱ्यावर आहेत.

बीजिंगः भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर सध्या तीन दिवसांच्या चीनच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांशी संवाद साधला आहे. देशात अनिश्चिततेचे वातावरण असताना भारत-चीनचे संबंध स्थिर राहणे गरजेचे आहे. जयशंकर यांनी चिनी उपराष्ट्रपती वांग क्विशान यांच्याशी झोंग्ननहाईदरम्यान भेट घेतली आहे.त्यानंतर त्यांनी परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्यासोबत एक बैठक घेतली. राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचे विश्वासू वांग यांच्याशी बातचीत करताना ते म्हणाले, आमचं दोन वर्षांपूर्वीच द्विपक्षीय संबंधांसंदर्भात एकमत झालेलं आहे. देश अनिश्चिततेतून जात असताना आपले संबंध स्थिर राहण्याची गरज आहे.चीनमध्ये पुन्हा आल्यानं मी आनंदात आहे. माझी मागची वर्ष मी आनंदानं स्मरण करतो. मी नशीबवान आहे, मला अनौपचारिक पद्धतीनं शिखर संमेलनाची तयारी करण्याची संधी मिळाली.  जयशंकर यांचं स्वागत करत उपराष्ट्रपती वांग म्हणाले, मला हेसुद्धा माहीत आहे की, चीनमध्ये बऱ्याच काळापासून राहणारे जयशंकर हे भारतीय राजदूत आहेत. दोन्ही देशांचे द्विपक्षीय संबंध वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे. जयशंकर यांचा हा दौरा भारत आणि चीनसाठी फायदेशीर ठरणार असल्याचंही वांग म्हणाले. जयशंकर यांच्या या दौऱ्यात चार द्विपक्षीय करारांवर स्वाक्षरी केली जाणार आहे.