शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर राज्यसभा निवडणुकीचे निकाल जाहीर; नॅशनल कॉन्फरन्स 3, तर भाजपचा 1 जागेवर विजय
2
चीनचं धक्कादायक कारस्थान उघड, पँगाँग सरोवराजवळ उभारतोय एअर डिफेन्स कॉम्प्लेक्स
3
मोबाईल चार्जरमध्ये लपवलं १५० ग्रॅम सोनं, तेच ठरलं जीवघेणे; युवकाच्या हत्येचा अखेर उलगडा
4
सोन्या-चांदीचे दर कोसळले! सोनं 2,000, तर चांदी 4,000 रुपये स्वस्त; कारण काय..?
5
"कोणत्याही देशाच्या दबावाखाली व्यापार करार करणार नाही", पीयूष गोयल यांचे अमेरिकेला खडेबोल
6
IND vs AUS: कोहलीनं फॉर्म परत मिळवण्यासाठी काय करावं? मोहम्मद कैफचा मोलाचा सल्ला! म्हणाला...
7
दहावी पास झालेल्यांसाठी सरकारी नोकरीची संधी! ३९१ कॉन्स्टेबल जीडी पदांची भरती निघाली
8
‘मोबाईल सर्व्हेलन्स’च्या मुद्द्यावरून बावनकुळेंची सारवासारव, व्हॉट्सअप ग्रुप्सबाबत बोलल्याचा दावा
9
१ लाख व्हॉट्सअप ग्रुप, भाजपाची 'वॉर रूम'; कशी चालते यंत्रणा? बावनकुळेंनी सगळेच सांगितले
10
धडाकेबाज PSI 'बदने'वर बलात्काराचा आरोप! तस्करांना पकडणारा अधिकारी महिला डॉक्टरच्या मृत्यूनंतर फरार
11
डॉक्टर अवघड शस्त्रक्रिया करत होते. ती ऑपरेशन टेबलवर सनई वाजवत होती, व्हिडीओ व्हायरल
12
"मला न्याय हवाय, पती-मुलाला लोखंडी रॉडने मारहाण..."; भाजपा महिला नेत्याचा रस्त्यावर ठिय्या
13
'All is not well with the UN', संयुक्त राष्ट्र संघाबाबत जयशंकर यांचे मोठे वक्तव्य...
14
Crocodile Torture: वसाहतीत घुसलेल्या मगरीसोबत तरुणांचं अमानुष कृत्य, आरोपींचा शोध सुरू!
15
Asia Cup Trophy Hidden Place In Abu Dhabi : पाकची नवी नौटंकी! आशिया कप ट्रॉफी अबुधाबीत लपवली?
16
भारतीय पुरुषांच्या 'स्पर्म क्वालिटी'ने अभ्यासक अवाक्; रिपोर्टमधून 'जगावेगळं'च चित्र समोर
17
आशियाई हवाई हद्दीत अचानक उडताना दिसली रशियाची आण्विक फायटर जेट्स, नेमकं प्रकरण काय?
18
काही सेकंदात होतात जळून खाक, खाजगी बसला आग लागल्यावर प्रवाशांचं वाचणं का होतं कठीण?
19
अरे बापरे! कर्मचाऱ्याच्या प्रेमात वेडी झाली मालकीण; लग्नानंतर 'त्याने'च लावला कोट्यवधींचा चुना
20
मॅडॉक फिल्म्सच्या 'चामुंडा'मध्ये आलिया भटची एन्ट्री कन्फर्म? दिग्दर्शक अमर कौशिक म्हणाले...

आशियाई हवाई हद्दीत अचानक उडताना दिसली रशियाची आण्विक फायटर जेट्स, नेमकं प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 17:59 IST

russia nuclear fighter jet tu95ms news: रशियाची फायटर जेट्स आशियाई हवाई हद्दीत दिसल्याने उडाली खळबळ

russia nuclear fighter jet tu95ms news: गेल्या काही महिन्यांपासून आशिया खंडातील विविध देशांमध्ये अंतर्गत आणि परकीय आक्रमणे सुरू आहेत. काही देशांमध्ये सत्तापालटही झाला आहे. तशातच शुक्रवारी आशियाई उपखंडाच्या हवाई हद्दीत अचानत रशियन आण्विक लढाऊ-बॉम्बर विमान म्हणजे फायटर जेट उडताना दिसल्याने खळबळ उडाली. रशिया आणि युक्रेन यांच्यात बराच युद्धजन्य परिस्थिती आहे. पण त्यांचे फायटर जेट आशियाई हवाई हद्दीत कुठून आले, त्याचा नेमका हेतु काय यावरून चर्चा रंगली. त्यावर रशियन संरक्षण मंत्रालयाने स्पष्टीकरण दिले.

रशियन संरक्षण मंत्रालयाचे म्हणणे काय?

रशियाच्या अधिकृत स्टेट वृत्तसंस्थेच्या म्हणण्यानुसार, रशियन संरक्षण मंत्रालयाने पुष्टी केली की Tu-95MS हे स्ट्रॅटेजिक बॉम्बर विमान आशियाई हवाई हद्दीत उडताना दिसल्याचे बाब खरी आहे. हे लढाऊ विमान जपानी समुद्रावरील आंतरराष्ट्रीय हवाई व जलक्षेत्रात गस्त घालत होते. पण ते एक नियमित गस्त उड्डाण म्हणजेच 'रूटीन पेट्रोलिंग' होते. रशियन संरक्षण मंत्रालयाच्या निवेदनानुसार, हे उड्डाण रशियाच्या लांब पल्ल्याच्या विमानांची तयारी तपासण्यासाठी आणि चाचपणी करण्यासाठी 'रूटीन पेट्रोलिंग' मोहिमेचा भाग होते.

परदेशी देशांची विमानेही दिसली सोबत

रशियाने आपले Tu-95MS हे स्ट्रॅटेजिक बॉम्बर विमान आशियाई हवाई हद्दीत उडवले होते. त्या उड्डाणादरम्यान काही परदेशी देशांचे लढाऊ विमानदेखील रशियन बॉम्बर विमानासोबत उड्डाण करत असल्याचे दिसून आले. मंत्रालयाने त्यावरही स्पष्टीकरण दिले आहे की, परदेशी विमानांनी विविध टप्प्यांवर रशियन बॉम्बर्सना एस्कॉर्ट केले होते, त्यामुळे ते सोबत उड्डाण करत होते. परंतु कोणताही संघर्ष किंवा तणाव निर्माण झाला नाही.

Tu-95MS फायटर जेटची वैशिष्ट्ये काय?

Tu-95MS या फायटर जेट्सना बेअर म्हणूनही ओळखले जाते. हे रशियाच्या सर्वात जुन्या परंतु सर्वात शक्तिशाली स्ट्रॅटेजिक बॉम्बर्सपैकी एक जेट आहे. अण्वस्त्रे आणि लांब पल्ल्याच्या क्षमतेसह ते रशियापासून थेट आशिया-पॅसिफिक प्रदेशाच्या कोणत्याही भागात उड्डाण करू शकते.

रूटीन पेट्रोलिंग की धोरणात्मक संदेश?

रशियाने याचे वर्णन "रूटीन पेट्रोलिंग" असे केले असले तरी, आंतरराष्ट्रीय विश्लेषक याकडे एक सूचक धोरणात्मक संदेश म्हणून पाहत आहेत. युक्रेन युद्ध आणि आशियातील बदलत्या भू-राजकीय गतिशीलतेदरम्यान, हे उड्डाण पाश्चात्य देश आणि जपानसाठी एक इशारा म्हणून पाहिले जात आहे. रशिया यातून केवळ युरोपमध्येच नव्हे तर आशिया खंडातही आपली लष्करी उपस्थिती दाखवू इच्छित असल्याचे जाणकारांचे मत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Russian Nuclear Jets Spotted in Asia: Routine Patrol or Warning?

Web Summary : Russian nuclear-capable Tu-95MS bombers flew in Asian airspace, sparking concern. Russia claims it was a routine patrol over the Sea of Japan to test readiness. Foreign aircraft escorted the bombers. Analysts see it as a strategic message amidst geopolitical tensions.
टॅग्स :russiaरशियाnuclear warअणुयुद्धJapanजपान