शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

Russia Ukraine War: कीव्ह ताब्यात घेण्यासाठी पुतिन यांचा नवा डाव; रशिया करणार सिरियन याेद्ध्यांचा वापर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2022 06:19 IST

सिरियन आहेत शहरी युद्धांमध्ये निष्णात; रशियाकडून अशा प्रकारची भरती हाेत असल्याच्या बातम्या सिरियन माध्यमांमध्ये झळकल्या हाेत्या. युद्धात सहभागी हाेणाऱ्यांना २०० ते ३०० डाॅलर्स देण्याची रशियाची तयारी आहे.

वाॅशिंग्टन : युक्रेनची राजधानी कीव्ह या शहराला ताब्यात घेण्यासाठी रशियाला अजूनही यश मिळालेले नाही, त्यामुळे रशिया वेगळाच डाव खेळण्याच्या तयारीत आहे. शहरी युद्ध आणि संघर्षात निष्णात असलेल्या सिरियन याेद्ध्यांना पैसे देऊन कीव्हचा ताबा मिळविण्याची याेजना रशियाने आखल्याची माहिती सूत्रांनी दिली.

युक्रेनचे सैन्य व नागरिकांनी कडवा प्रतिकार केल्यामुळे रशियाला कीव्ह शहराचा ताबा मिळू शकलेला नाही. त्यामुळे रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतिन संतापले आहेत. त्यामुळे रशियाने सिरियातील याेद्ध्यांना या युद्धात वापरण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेतील काही सूत्रांनी रशियाच्या याेजनेबाबत माहिती दिली. त्यानुसार सिरियातील काहीजण रशियामध्ये यापूर्वीच दाखल झाले असून, कीव्हवर हल्ला करण्याची त्यांनी तयारी सुरू केली आहे. 

२०० ते ३०० डाॅलर्स देणार

रशियाकडून अशा प्रकारची भरती हाेत असल्याच्या बातम्या सिरियन माध्यमांमध्ये झळकल्या हाेत्या. युद्धात सहभागी हाेणाऱ्यांना २०० ते ३०० डाॅलर्स देण्याची रशियाची तयारी आहे. लिबियाविराेधातील युद्धामध्ये या लाेकांनी शहरी युद्धातून प्रतिकार केला हाेता. त्यात रशियाने सिरियाला मदत केली आहे.

आंतरराष्ट्रीय न्यायालयातील सुनावणीकडे रशियाची पाठयुक्रेनवर हल्ला केल्याप्रकरणी हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागण्यात आली आहे. त्याबाबत सोमवारी झालेल्या सुनावणीकडे रशियाने पाठ फिरविली. रशियाला ताबडतोब लढाई थांबविण्याचा आदेश द्यावा, अशी विनंती युक्रेनने आंतरराष्ट्रीय न्यायालयाला केली आहे. युक्रेनचे प्रतिनिधी ॲन्टॉन कोरिनेविच यांनी न्यायाधीशांना सांगितले की, युक्रेनमध्ये हत्याकांडे घडविण्यात आल्याचा रशियाचा आरोप अतिशय चुकीचा आहे. युक्रेनला आपल्या टाचेखाली ठेवण्याची रशियाला इच्छा आहे. त्यामुळे त्यांनी हे युद्ध आमच्यावर लादले आहे.युद्धासंदर्भात आंतरराष्ट्रीय न्यायालय लवकरच निर्णय देण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयापुढे आलेल्या युक्रेनबाबतच्या तोंडी सुनावणीत सहभागी होण्यास रशियाने नकार दिला आहे.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशिया