शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

Russia vs Ukraine War: युद्धाचा राग रशियन बॉसवर काढला; युक्रेनच्या खलाशानं ५८ कोटींची यॉट बुडवली; पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2022 15:52 IST

Russia vs Ukraine War: रशिया युक्रेनवर करत असलेल्या हल्ल्यांचा राग युक्रेनी खलाशानं रशियन मालकावर काढला

कीव: रशिया विरुद्ध युक्रेन युद्धाचा आजचा दिवस सहावा दिवस आहे. युक्रेनची राजधानी कीव ताब्यात घेण्यासाठी रशियाचे प्रयत्न सुरू आहेत. रशियन सैन्य कीवच्या सीमेपर्यंत पोहोचलं आहे. राजधानी वाचवण्यासाठी युक्रेनी सैन्याचा संघर्ष सुरू आहे. युक्रेनच्या नागरिकांमध्ये हल्लेखोर रशियाबद्दल प्रचंड संताप आहे. 

रशियन बॉसला धडा शिकवण्यासाठी एका युक्रेनी खलाशानं त्याचं आलिशान जहाज बुडवण्याचा प्रयत्न केला. स्पेनमध्ये ही घटना घडली. जहाज बुडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या खलाशाला अटक करण्यात आली. रशियातील शस्त्रास्त्र कंपनी रोसोबोरोन एक्सपोर्टचे संचालक अलेक्झांडर मिखीव यांच्याकडे एक सुपरयॉट आहे. त्यावर युक्रेनी नागरिक खलाशी म्हणून कार्यरत होता. रशियानं मायदेशावर हल्ला केल्याचं त्यानं टीव्हीवर पाहिलं. याचा बदला म्हणून त्यानं रशियन बॉसचं आलिशान जहाज बुडवण्याचा निर्णय घेतला.

अलेक्झांडर मिखीव यांच्या सुपरयॉटचं नाव अनास्टासिया आहे. यॉट १५७ फूट लांबीची असून तिची किंमत ५८ कोटी रुपये इतकी आहे. स्पेनच्या मेजोर्का बंदरात जहाज उभं असताना युक्रेनी नागरिकानं तिचे व्हॉल्व उघडले. त्यामुळे जहाज काही प्रमाणात बुडालं. यानंतर युक्रेनी नागरिकाला सिव्हिल गार्ड्सनी अटक केली. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं. आपल्याला कृत्याचा कोणताही पश्चाताप नसल्यानं खलाशानं न्यायाधीशांना सांगितलं.

रशियन सैन्य युक्रेनमध्ये घुसून हल्ले करत असल्याचा व्हिडीओ पाहिल्याचं खलाशानं सांगितलं. रशियन सैन्य निष्पाप नागरिकांना लक्ष्य करत आहे. त्यामुळे रशियन मालकाचं जहाज बुडवण्याचं ठरवलं असं तो पुढे म्हणाला. अलेक्झांडर मिखीव यांनी यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. अलेक्झांडर मिखीव शस्त्रास्त्रं निर्यातीचा व्यवसाय करतात. त्यांची कंपनी रणगाड्यांपासून लढाऊ विमानं, जहाजांपर्यंत अनेक शस्त्रास्त्रं निर्यात करते.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशिया